प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ भाजपला जाणार? माजी आमदाराचे सुचक विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी ते निवडून येत असलेला ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी सरनाईक यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली, अशा चर्चा आहेत. या चर्चांचे आम्ही दो जिस्म एक जान है हम असे म्हणतं स्वतः आमदार सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांनी खंडन केले आहे. मात्र ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी हे असे होवू शकते असे म्हणतं सुचक वक्तव्य केले आहे.

ADVERTISEMENT

सुभाष भोईर काय म्हणाले?

सुभाष भोईर यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितले की, यासंबंधी कल्पना नाही, परंतु तसे होऊ शकते. तसेच निवडणूक पुढे ढकलण्यावरूनही टोला हाणत ते म्हणाले, भविष्यात भाजप आणि शिंदे गट वेगवेगळे लढू शकतात. ठाकरे गट व मनसे देखील वेगळे लढतील. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. पायाखालची वाळू घसरली की, माणूस पुढे जातो, तशा निवडणुका पुढे जात आहेत. प्रत्यक्षात निवडणुका लागल्या की प्रत्येकाची ताकद किती हे दिसून येईल असेही भोईर म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे – सरनाईक वादाच्या चर्चा :

मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून ताणले आहेत. तसेच दोघांमध्ये दोन-तीनदा खडाजंगीही झाली. याचे कारण म्हणजे सरनाईक निवडून येत असलेला ओवळा माजीवाडा हा मतदारसंघ भाजपच्या एका माजी आमदाराला द्यावा यासाठी शिंदे आग्रही आहेत.

हे वाचलं का?

त्यासाठी शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. सरनाईकांना ही गोष्ट कळताच त्यांनी थेट शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली, अशा प्रकारच्या चर्चा होत्या.

प्रताप सरनाईक ‘मुंबई Tak’शी बोलताना काय म्हणाले?

“कोण अशा बातम्या पेरतं, याची मला काही कल्पना नाही. योगायोगाने मी आणि मुख्यमंत्री साहेब एकत्रच आहोत. गेली २५ वर्ष आम्ही मित्र म्हणून काम करत आहे. आता ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु महापालिकेत नगरसेवक पदापासून आम्ही गेली अनेक वर्ष एकत्र आहोत. आजच माझ्या मुलाने ट्विट केलंय की, दो जिस्म एक जान है हम. त्यामुळे गेले २५ ते २७ वर्षात जे झालं नाही, ते आता कशाला होईल. आतातर ठाणेकरांसाठी आनंदाचे दिवस सुरू आहेत. ठाण्याचा मुख्यमंत्री आहे”, असे सरनाईक यांनी म्हटले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT