Monsoon Session 2021 : संसदेच्या अधिवेशनात नुसता गोंधळ….तुमचा पैसा कसा होतोय खर्च? समजून घ्या
संसदेचं अधिवेशन असो किंवा विधिमंडळाचं अधिवेशन…गोंधळ, राडा, गदारोळ हल्ली प्रत्येक अधिवेशनात पाहायला मिळतो….इतका गोंधळ होतो की जेमतेम काही तास सुरू असलेलं अधिवेशन तहकूब होत राहतं….पण या सगळ्या अधिवेशनासाठी जो खर्च केला जातो ना, तो आपल्याच पैशातून असतो. मग आपल्याच पैशातून आपल्याच हितासाठी आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गोंधळ घालतात, तेव्हा किती पैसा वाया जातो? संसदेच्या एका […]
ADVERTISEMENT

संसदेचं अधिवेशन असो किंवा विधिमंडळाचं अधिवेशन…गोंधळ, राडा, गदारोळ हल्ली प्रत्येक अधिवेशनात पाहायला मिळतो….इतका गोंधळ होतो की जेमतेम काही तास सुरू असलेलं अधिवेशन तहकूब होत राहतं….पण या सगळ्या अधिवेशनासाठी जो खर्च केला जातो ना, तो आपल्याच पैशातून असतो. मग आपल्याच पैशातून आपल्याच हितासाठी आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी गोंधळ घालतात, तेव्हा किती पैसा वाया जातो? संसदेच्या एका अधिवेशनासाठी किती खर्च येतो? हेच आज आपण जाणून घेऊयात.
वर्षातून संसदेचे 3 अधिवेशनं होत असतात. एक अर्थसंकल्पीय अधिवेशन जे साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान होतं. दुसरं होतं ते पावसाळी अधिवेशन जे जुलै ते सप्टेंबर दरम्यान होतं आणि तिसरं असतं ते हिवाळी अधिवेशन जे नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होतं.
सामान्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडणं, सामान्यांच्या हिताने निर्णय घेणं, नवी धोरणं, नवे कायदे अंमलात आणणं अशा विविध कामांसाठी ही अधिवेशनं घेणं गरजेचं असतं. लोकप्रतिनिधी सतत संसदेत बसून राहिले तर प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघात जाऊन कधी कामं करणार? म्हणून संसदेचं कामकाज हे काही 24 तास 12 महिने चालू नसतं. तर वर्षातून 3 वेळा अधिवेशनं बोलावून कामकाज करता येतं.









