ड्रग्स केस: अभिनेता फरदीन खानकडेही सापडलं होतं ड्रग्स, तेव्हा काय झाली होती शिक्षा?
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) ताब्यात आहे. मुंबई-गोवा क्रूझवर करण्यात आलेल्या छापेमारीत आर्यन खान याला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. याचप्रकरणी आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. असं असताना या संपूर्ण प्रकरणात आर्यनवर नेमकी काय कारवाई होणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. पण आता […]
ADVERTISEMENT
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (NCB) ताब्यात आहे. मुंबई-गोवा क्रूझवर करण्यात आलेल्या छापेमारीत आर्यन खान याला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. याचप्रकरणी आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. असं असताना या संपूर्ण प्रकरणात आर्यनवर नेमकी काय कारवाई होणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. पण आता आर्यनच्या अटकेनंतर एका अशाच प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे प्रकरण म्हणजे बॉलिवूड अभिनेता फरदीन खान याच्या अटकेची. अभिनेता फरदीन खान याला देखील ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी फरदीनकडे किती प्रमाणात ड्रग्स मिळालं होतं आणि या प्रकरणात त्याला नेमकी काय शिक्षा झाली होती याबाबत जाणून घेऊयात सविस्तरपणे.
फरदीन खान हा मागील काही वर्षापासून ग्लॅमरस जगतापासून दूर गेला आहे. पण आर्यन खानच्या अटकेनंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. साधारण 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2001 साली फरदीनला ड्रग्स प्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली होती. 2001 साली नाशिकमध्ये ड्रग्स सप्लायर्सकडून कोकीन खरेदी करताना फरदीनला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, तेव्हा फरदीनकडे 1 ग्रामपेक्षा कमी प्रमाणात कोकीन सापडलं होतं. ज्यामुळे त्याच्यावर कलम 21 (A) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे फरदीन खान याला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते.
हे वाचलं का?
दरम्यान, काही दिवसांनी तो जामिनावर सुटून बाहेर आला. ज्यानंतर एका शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. ज्यानंतर त्याची ड्रग्स सेवनाची सवय सुटली. पण यासाठी त्याला स्वत:शीच प्रचंड झगडावं लागलं.
या सगळ्या दरम्यान, फरदीनविरोधात कोर्टात केस सुरुच होती. अखेर अनेक सुनावण्यांनंतर मुंबईच्या विशेष कोर्टाने फरदीन खान याला कोकीन प्रकरणी निर्दोष सोडण्यात आलं होतं. म्हणजेच अनेक वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर फरदीन खान या सर्व प्रकरणातून सही सलामत बाहेर पडला. पण या सगळ्याचा परिणाम त्याच्या कारकीर्दीवर झाला. कारण तेव्हापासून तो बॉलिवूडमधून जवळजवळ गायबच झाला आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खानवर काय कारवाई होऊ शकते?
ADVERTISEMENT
एनसीबीला आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलेलं नसलं तरी त्याच्या मोबाइलमध्ये अशा काही लिंक्स सापडल्या आहेत की, ज्याचं आंतरराष्ट्रीय ड्रग्स पेडलरसोबत कनेक्शन असू शकतं असा दावा एनसीबीने कोर्टात केला आहे. त्यामुळेच याबाबतच्या चौकशीसाठी कोर्टाने त्याची कोठडी वाढवून दिली आहे.
आर्यनवर NCB ने 8 (C), 20B, 27, 35 ही कलमं लावली आहेत. त्यामुळे आता NCB ला या कलमांतर्गंत NCB ला पुरावाच्या आधारे कोर्टात गुन्हा सिद्ध करावा लागणार आहे. मात्र, याबाबतचे नेमके आरोप आर्यनवर सिद्ध होत नाही तोवर त्याच्यावर कोणत्या स्वरुपाची कारवाई होईल याबाबत स्पष्टता येणार नाही.
अरबाझ मर्चंटच्या वडिलांनी आर्यनला विचारलं, ‘तुला घरचं जेवण आणून देऊ का?’ आर्यन म्हणाला…
किती ड्रग्स बाळगल्यास काय होते शिक्षा?
-
जर स्मॉल कॅटेगरीत ड्रग्स आढळलं तर आरोपीला 6 महिने तुरुंगवास किंवा दंड ठोठावला जातो.
-
कमर्शिअल कॅटेगरीत ड्रग्स आढळल्यास 10 ते 20 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.
-
दोन्हींच्या मध्ये ड्रग्स सापडल्यास आरोपीला 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाखापर्यंतचा दंड होतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT