दुसरे राऊतही तुरुंगात जाणार? विनायक राऊत यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल
गडचिरोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ठाण्यातील महाप्रबोधन सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आणि आमदार-खासदारांविरोधात शिवीगाळ, समाजात फूट पाडणारी वक्तव्य केल्याचा आरोप राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेबांची शिवसेना […]
ADVERTISEMENT
गडचिरोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. ठाण्यातील महाप्रबोधन सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आणि आमदार-खासदारांविरोधात शिवीगाळ, समाजात फूट पाडणारी वक्तव्य केल्याचा आरोप राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
याबाबत बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्त्यांनी राऊत यांच्याविरोधात मुलचेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. तक्रारीवेळी प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेली महाप्रबोधन यात्रेची क्लिप देखील पोलिसांना सुपूर्द करण्यात आली होती.
याबाबत बोलताना बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आमदार आणि खासदारांना शिवीगाळ करत त्यांच्याबाबत अत्यंत खालच्या दर्जाच्या केलेल्या आम्ही निषेध करतो. तसंच यापुढे राऊत यांनी त्यांच्या भाषेवर कंट्रोल न केल्यास त्यांच्याविरोधत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
हे वाचलं का?
विनायक राऊत काय म्हणाले?
दाखल गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत म्हणाले, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नंगा नाच केलेला चालतो. उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांना शिवीगाळ केलेली चालते. एका आमदाराने थेट पोलीस स्थानकात जाऊन गोळीबार केलेला चालतो. हिंगोलीच्या एका आमदाराने टाळकं फोडेनं, आडवे करा म्हटलेलं चालतं.
मग आम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन काही बोललो तर त्यात काही तरी शोधायचं आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करायचा. पोलीस आणि प्रशासन यांचा दुरूपयोग शिंदे सरकार करत आहे. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
महाप्रबोधन यात्रा आणि जाहीर मेळाव्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटातील ७ नेत्यांविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील नौपाडा उपविभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांच्या तक्रारीवरुन नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना (ठाकरे गट) नेते, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता बिर्जे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आणि सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ मध्ये जास्तीत १ वर्षाचा कारवास किंवा दंड ठोठावला जातो. किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT