इचलकरंजी : वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आग, जिवीतहानी नाही
कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आज भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं कळतं आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या औद्योगिक वसाहतीमधील विजेता प्रॉडक्ट या ऑइल कंपनीचे आगीत सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज सकाळी फॅक्टरीला अचानक आग लागली. तब्बल २५ हून अधिक अग्निशमन बंबांच्या मदतीने ही आग […]
ADVERTISEMENT
कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या ऑईल निर्मितीच्या कारखान्याला आज भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं कळतं आहे.
ADVERTISEMENT
कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या औद्योगिक वसाहतीमधील विजेता प्रॉडक्ट या ऑइल कंपनीचे आगीत सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे. आज सकाळी फॅक्टरीला अचानक आग लागली. तब्बल २५ हून अधिक अग्निशमन बंबांच्या मदतीने ही आग विझविण्यास आली आहे. दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क या वसाहतीत गेल्या सहा महिन्यांपासून विजेता प्रोडक्ट हा वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीचा कारखाना सुरु होता. अचानक या कारखान्यात आग लागली. ऑइलसारख्या जळाऊ पदार्थ कारखान्यात असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोट दूरवरून दिसत होते. घटनास्थळी लोकांनी प्रसंगावधान राखल्यामुळए जीवितहानी टळली आहे. आसपासच्या नगरपालिका हद्दीतील तसेच सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल २५ अग्निशामक बंबाच्यासहाय्याने अडीच तासानंतर ही आग विझवण्यात यश आले. या आगीत अंदाजे सुमारे २० लाखाचे नुकसान झालंय .
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT