आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणातल्या ‘या’ दोन आरोपींना जामीन मंजूर

विद्या

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर केला आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशा दोघांना कोर्टाने 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन जण आहेत. मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर केला आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशा दोघांना कोर्टाने 50 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन जण आहेत.

मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे प्रवासी असल्याचं सांगण्यात आलं. एनसीबीने राजघारीयाकडून 2.4 ग्रॅम गांजाही केला होता. तर अविन साहूकडून काहीही जप्त करण्यात आलं नव्हतं. कोर्टाने गेल्या आठवड्यात या दोघांच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता. एक सहआरोपी मनिष राजघारियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजघारियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Exclusive: आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मोठा ट्विस्ट, के.पी. गोसावीच्या बॉडीगार्डने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

दरम्यान जज व्ही. व्ही. पाटील मंगळवारी यावर सुनावणी घेतली. अॅडव्होकेट अयाझ खान यांनी नुपूर सतलेजाच्या बाजूने युक्तीवाद केला होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आजचं कोर्टाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आता उद्या दुपारी ही सुनावणी पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे.