आनंदाची बातमी ! Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१ मे पासून देशभरात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. देशातील काही राज्यांत लसीचा तुटवडा जाणवत असताना भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. रशियात तयार झालेल्या Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल झाली आहे. हैदराबादमध्ये ही लस आलेली आहे.

ADVERTISEMENT

Sputnik V ने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीला आपल्याला हरवायचं आहे आणि आपण सर्वजण एकत्र येऊन ही गोष्ट नक्कीच करु शकतो असं Sputnik V ने म्हटलं आहे. भारतात एकूण सहा टप्प्यांमध्ये ही लस आणली जाणार असून पहिला टप्पा मे महिन्यात आलेला आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस नागरिकांना दिली जात आहे.

Sputnik V लस 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी?

हे वाचलं का?

डॉ. रेड्डीजचे सीईओ दीपक सप्रा यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत लसीबद्दल माहिती दिली होती. डॉ. रेड्डीज या प्रयोगशाळेने एप्रिलच्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे संमती मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात Sputnik V लसीची चाचणी केली होती. Sputnik V च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही लस 91 टक्के प्रभावी आहे.

2021 या संपूर्ण वर्षात Sputnik V या लसीचे 12 ते 13 कोटी लोकांना लस देण्याची आमची तयारी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील लसी आयात केल्या जातील या लसी उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा भारतात निर्मिती सुरू होईल तेव्हा आम्ही त्या केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि खासगी रूग्णालयांना देणार आहोत असंही सप्रा यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

या लसीची किंमत भारतात काय असेल हे आम्ही विचारलं तेव्हा दीपक सप्रा म्हणाले की ‘रशियाकडून आयात होणाऱ्या लसीच्या किंमतीत आणि भारतात तयार होणाऱ्या लसींच्या किंमतीत फरक असेल. आम्ही त्यावर विचार करतो आहोत. स्पुटनिक व्ही ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचंही सप्रा यांनी स्पष्ट केलं. ‘

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT