आर्यन खान प्रकरणातील NCB चे दोन तपास अधिकारी निलंबित, कारण गुलदस्त्यात

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान प्रकरणातील दोन तपास अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यामागे नेमकं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विश्व विजय सिंग हे आर्यन खान प्रकरणातले इंटेलिजन्स ऑफिसर आहेत. तर प्रसाद हे देखील याच केसशी संबंधित काम बघत होते.

ADVERTISEMENT

या दोघांचं निलंबन का करण्यात आलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आर्यन खान प्रकरणातील या दोन अधिकाऱ्यांची vigilance inquiry केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

हे वाचलं का?

२ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर NCB ने छापा मारला होता. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांसह एकूण ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मोठी बातमी! आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

ADVERTISEMENT

३ ऑक्टोबरला ही कारवाई झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर चार दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

ADVERTISEMENT

एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कार्यवाहीची माहिती दिली आहे. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : आरोपपत्र दाखल करण्यासाठी का हवाय वेळ?; एनसीबीने दिली कारणांची यादी

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.

एनसीबीचे 22 अधिकारी प्रवाशी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं. मात्र हे सगळं प्रकरण म्हणजे एनसीबीने रचलेला बनाव आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर आणि त्यांच्या कमाईवर, जात प्रमाणपत्रावरही चांगलेच प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या प्रकरणातून समीर वानखेडे यांना बाजूला कऱण्यात आलं. आता आज जवळपास सहा महिन्यांनी या प्रकरणातल्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT