वर्ध्यात नदीत पोहायला गेलेले चार तरूण बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगणघाट तालुक्याच्या हिवरा गावातील नदीत पोहायला गेलेले चार युवक नदीत बुडाल्याने त्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे बचावले आहे ही धक्कादायक घटना आज संध्याकाळ च्या सुमारास घडली आहे. 

ADVERTISEMENT

यातील रुतीक नरेश पोखळे (वय‌ २१ वर्षे) आणि संघर्ष चंदुजी लढे (वय १६ वर्षे) पिपरी राहणार पिपरी यांचा नदीत बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला तर  रंणजित रामजी धाबर्डे २८ वर्ष आणि शुभम सुधारकर लढे २६ वर्ष ह्यांना स्थानिक नागरिकांनी  तात्काळ पाण्याबाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचवले आहे 

आज रविवारी सुट्टी असल्याने पिपरी येथिल चार ही जण दुपार नंतर  दुचाकीने आजनसरा येथुन हिवरा येथिल वर्धा नदीत पोहायला गेले नदीत पोहत असतां मात्र या चौद्यांना नदितील पाण्याचा अंदाज आला नसल्याने चार ही युवक नदीत बुडू लागल्याने आरडाओरड केली जवळच असलेल्या हिवरा गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनेची माहिती वडनेर पोलिस ठाण्याला देण्यात आली तात्काळ पोलीस निरीक्षक बागडे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली तो पर्यंत नागरिकांनी रणजीत रामजी धाबर्डे २८ वर्ष आणि शुभम सुधारकर लढे २६ वर्ष यांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले तर रुतीक नरेश पोखळे वय‌ २१ वर्ष आणि संघर्ष चंदुजी लढे वय १६ वर्ष यांचा पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे परीसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT