पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला PSI नेच मागितली लाखोंची लाच; रंगेहाथ अटक
-समीर शेख, सांगवी बलात्काराच्या गुन्ह्यात सहकार्य करण्याचे सांगत 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमा सोळुंखे नामक एका पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे. याच प्रकरणातील तिचा साथीदार असलेला सहाय्यक फौजदार अशोक देसाई हा फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सांगवी परिसरात राहणाऱ्या एका […]
ADVERTISEMENT
-समीर शेख, सांगवी
ADVERTISEMENT
बलात्काराच्या गुन्ह्यात सहकार्य करण्याचे सांगत 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमा सोळुंखे नामक एका पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे.
याच प्रकरणातील तिचा साथीदार असलेला सहाय्यक फौजदार अशोक देसाई हा फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सांगवी परिसरात राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात केलेल्या तक्रारीमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंखे व सहाय्यक फौजदार देसाई यांनी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितली होती.
हे वाचलं का?
दरम्यान, बलात्काराचा आरोप आणि लाच प्रकरणी पीडित 42 वर्षीय व्यक्तीने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. साधारणत: 2 वेळा या आरोपाची पडताळणी केल्यानंतर सोळुंखे हिने 70 हजार रुपयात तडजोड करण्याचे मान्य केल्याने आज ही रक्कम तिने सांगवी पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वीकारली.
तेव्हाच पोलिसांनी तिला रंगेहाथ अटक कली तर सोळुंखे हिचा सहकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक देसाई हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला. ज्याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
सदरच्या कथित प्रकरणी लाच स्वीकारणारी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिद्धाराम सोळुंखे हिला लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून तिच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कळताच शहरातील पोलिसांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
‘केडीएमसी’च्या अधिकाऱ्यांनी घेतले 25 लाख; बिल्डरचा आरोप, CCTV फूटेजमुळे खळबळ
लाचखोर शिक्षणाधिकारी, तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं
दरम्यान, कही दिवसापूर्वीच एका लाचखोल शिक्षणाधिकारीला देखील रंगेहाथ अटक करण्यात आली होती. शाळेला मंजूर अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी वैशाली वीर-झनकर व वाहनचालक रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली होती. यामध्ये एका मध्यस्थी प्राथमिक शाळेच्या शिक्षकासह शिक्षणाधिकारी व वाहनचालकाला अटक करण्यात आली होती.
नाशिकच्या एका खाजगी संस्थेच्या शाळांना 20% याप्रमाणे अनुदान मंजूर झाले होते व याप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्यासाठी संस्थाचालकांकडे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी मध्यस्थ म्हणून काम करतो असे सांगून जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्यासाठी 9 लाख रुपयाची मागणी केली होती.
ठरल्यानुसार मध्यस्थ शिक्षकाने संस्थाचालक व शिक्षणधिकारी वैशाली वीर-झनकर यांची भेट घालून दिली होती. तडजोड होऊन 8 लाख रुपये ठरले व ती रोख रक्कम शिक्षणाधिकारी यांचे वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांच्याकडे देण्यास सांगितले होते. येवले यांनी रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT