गांधीधाम-पुरी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका! नंदुरबार रेल्वे स्थानकावरील थरारक घटना
नंदूरबार रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे गाडीमध्येच आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. गांधीधाम-पुरी एक्सप्रेसमध्ये (gandhidham puri Express) आगीने तांडव घातलं. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच आग झपाट्याने वाढत गेल्यानं प्रवाशी प्रचंड हादरून गेले होते. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची प्रचंड धावपळ उडाली. मोटरमनने तत्काळ गाडी थांबवली. त्यानंतर आगी विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली […]
ADVERTISEMENT
नंदूरबार रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे गाडीमध्येच आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. गांधीधाम-पुरी एक्सप्रेसमध्ये (gandhidham puri Express) आगीने तांडव घातलं. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच आग झपाट्याने वाढत गेल्यानं प्रवाशी प्रचंड हादरून गेले होते. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची प्रचंड धावपळ उडाली. मोटरमनने तत्काळ गाडी थांबवली. त्यानंतर आगी विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
नंदूरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असतानाच गांधीनगरकडून पुरी कडे जाणाऱ्या रेल्वे गाडीमध्ये आग लागली. आग लागल्याचं कळल्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी एकच गोंधळ केला. आगीचे लोळ बोगीला कवेत घेत असल्याने धुराचे मोठे लोट बाहेर पडायला सुरूवात झाली. तसेच इतर बोगीमध्ये धूर शिरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन काही मिनिटांवर आलेलं असल्याने गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोटरमनने लगेच गाडी थांबवली.
हे वाचलं का?
आग लागल्याची घटना एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री बोगीमध्ये घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून आग लागलेल्या पॅन्ट्रीला गाडीच्या अन्य डब्यांपासुन वेगळं करण्यात आलं. प्रवासी डबे वेगळे करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
ही आग विझवण्यासाठी नंदुरबार अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात असून, रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासह प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आग विझविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर विशेष परिणाम होणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
आज सकाळी गांधीधाम-पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकापासून काही होती. त्याचवेळी एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. (पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असतं.)
बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्रवतार धारण केल्याने आगीच्या लोळांबरोबर धुराचे लोटही वेगाने पसरले. त्यामुळे प्रवाशी हादरून गेले. गाडी थांबवण्यात आल्यानंतर प्रवाशांनी सोबतचं सामान गाडीत ठेवूनच खाली उड्या मारल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT