आक्षेपार्ह Video व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह 5 जणांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर शेख

ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडजवळच असलेल्या देहूरोड भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये प्रियकरासह त्याच्या इतर पाच मित्रांनी मिळून प्रेयसीवर (Girl friend) सामूहिक अत्याचार (gang rape) केले आहेत. त्यानंतर पीडितेने पोलिसांकडे सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दिली. त्याआधारे देहूरोड पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करुन या घटनेत सहभागी असलेल्यांना आरोपींना त्वरीत अटक (Arrest) करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच जणांपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा प्रेमी तरूण यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांच्या भेटीगाठी होत असत. यादरम्यान प्रियकराने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने आपल्याच प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हीडिओ आपल्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड केले व ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रियकरासह एकूण पाच जणांनी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

हे वाचलं का?

हा संपूर्ण प्रकार मागील 5 महिन्यांपासून सुरु होता. अखेर सतत होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून पीडितेने ही माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना दिली. त्याविषयी पोलिसांनी प्रथम या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच युनिट 2 मार्फत केला आणि नंतर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणात देहूरोड पोलिसांनी आतापर्यंत गुन्ह्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी प्रेमी नोमान उर्फ ​​अरबाज जावेद खान सह, सुलतान उर्फ ​​मुस्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ ​​मन्नान जावेद खान यांना जबरदस्तीने लैंगिक आणि सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. याशिवाय आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. जे अल्पवयीन असल्याचे समजतं आहे. दरम्यान, आता पोलीस असाही तपास करत आहेत की, या तरुणांनी याआधी देखील अशाप्रकारे इतर कोणावर अत्याचार केले आहेत का. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिने अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही यावेळी केली आहे. दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या या आरोपी व्यक्तिरिक्त इतरही कुणी या गुन्ह्यात सहभागी होते का? याचा देखील पोलीस तपास करत आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपी या गुन्ह्यात असल्याने पोलीस देखील याप्रकरणी अतिशय वेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT