Mumbai Crime: अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा पैकी 3 आरोपीही Minor
मुंबई: मुंबईतील (Mumbai) एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 6 आरोपींपैकी 3 आरोपी अल्पवयीन आहेत तर 3 जण प्रौढ आहे. दरम्यान, गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी या सहाही आरोपींना तात्काळ अटक (Arrest) केली आहे. (gang rape with […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबईतील (Mumbai) एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 6 आरोपींपैकी 3 आरोपी अल्पवयीन आहेत तर 3 जण प्रौढ आहे. दरम्यान, गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी या सहाही आरोपींना तात्काळ अटक (Arrest) केली आहे. (gang rape with minor in mumbai police arrested 6 accused)
ADVERTISEMENT
ज्यानंतर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवले आहे. NM जोशी मार्ग पोलिसांनी IPC च्या 376(D)(2)(N), 34 आणि POCSO कायद्याच्या 4, 5, 6, 8, 10, 12, 17 कलमान्वये नोंद केली आहे.
याप्रकरणी काल (23 डिसेंबर) 3 प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोर्टाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती एनएम जोशी मार्ग पोलिसांनी दिली आहे.
हे वाचलं का?
कल्याणमध्ये ९ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या, नराधमाकडून बकरीवरही अत्याचाराचा प्रयत्न
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांना ओळखत होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, जेव्हा ही घटना उघडकीस झाली तेव्हा त्यानंतर पीडित कुटुंबीयानी तात्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT
मुंबई हादरली! महिलेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगाला सिगारेटचे चटके, Video बनवून दिली धमकी
ADVERTISEMENT
16 वर्षाच्या मुलीवर 8 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालघर जिल्ह्यात देखील एका अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती.
नशेच्या आहारी गेलेल्या 8 तरुणांनी अल्पवयीन मुलीवर आधी माहीममधील एका निर्जन बंगल्यावर नेऊन अत्याचार केले होते. त्यानंतर समुद्रकिनारी नेऊन पुन्हा आळीपाळीने अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती.
बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी ही माहीम भागात राहते. 16 डिसेंबरच्या रात्री 8 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 8 जणांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी करणे), कलम 341, कलम 342, 323 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT