पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपीने तिच्या छातीवर गोळी झाडली. ती गोळी मोबाईलवर चालल्याने यातून ती बचावली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या घटनेत तिला दुखापत झाली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

कृष्णा ऊर्फ रोहन अशोक ओव्हाळ (वय 24 रा. हडपसर), निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (वय 20 रा. वारजे माळेवाडी )असे या दोघांना अटक करण्यात आली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

‘बलात्कार पीडितेशी लग्न करणार का?’ कोर्टाचा जळगावच्या आरोपीला सवाल

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही तिच्या मैत्रिणीसोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. तेव्हा वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर ती तेथून निघाली. तेवढ्यात त्या तिघांपैकी एक जण म्हणाला आणखी दोघे जण येणार आहेत. तू थांब नाही तर तुला मारून टाकेन, याबद्दल कोणाला सांगायचं नाही. असा पीडीत तरुणीला दम दिला.पीडित तरुणीने त्याला विरोध केला. त्यानंतर एका आरोपीने पोट माळ्यावर असलेली पिस्तुल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली.

रेखा जरेंची हत्या ते बाळ बोठेची अटक,
जाणून घ्या घटनाक्रम

ADVERTISEMENT

पीडित तरूणीवर जेव्हा गोळी चालवण्यात आली तेव्हा ती गोळी तिच्या जवळ असलेल्या मोबाईलवर चालली. त्यामुळे या तरूणीचा जीव वाचला, या तरूणीला दुखापत झाली.तिला आणि तिच्या मैत्रिणीला कात्रज येथे सोडून देण्यात आले. तेथील एका रुग्णालयात उपचार करून ती तरुणी घरी गेली. त्यानंतर या प्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू असल्याचे सहकारनगर पोलिस कडून सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT