मुलींना अजिबात आवडत नाहीत अशा प्रकारची मुलं, लगेच सुधारा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रत्येकाला माहित आहे की विरुद्ध गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. स्त्री-पुरुष एकमेकांना अनेकदा आकर्षित करतात. पण पुरुष आणि महिलांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्यांना अजिबात आवडत नाहीत. प्रत्येकामध्ये काही चांगले-वाईट गुण हे असतातच. त्याच वेळी, जर आपण महिलांचा विचार केला तर त्या पुरुषांबद्दलच्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. अशा स्थितीत महिलांना पुरुषांच्या काही सवयी अजिबात आवडत नाहीत. याचा अर्थ असा नाही की एखाद्या स्त्रीला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदलले पाहिजे. तुम्हाला फक्त त्यांच्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

जर तुम्हाला एखादी स्त्री आवडत असेल तर तुम्हाला काही गोष्टी आधीच माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नकाराचा सामना करावा लागणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना अजिबात आवडत नाहीत.

स्वत:ला सर्वोच्च समजणारे:

हे वाचलं का?

महिलांना स्वत:ला उच्च आणि महिलांना नीच समजणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. महिलांना अशा लोकांपासून नेहमी दूर राहणे आवडते जे त्यांना अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हीही अशी व्यक्ती असाल तर लगेचच तुमची ही सवय बदला.

आजचे युग स्त्री आणि पुरुष दोघांचे आहे. स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एवढंच नव्हे तर काही क्षेत्रात महिलांनी पुरुषांना मागे देखील टाकले आहे. त्यामुळे महिलांना हीन समजण्याची चूक करू नका.

ADVERTISEMENT

महिलांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणं गरजेचं नाही:

ADVERTISEMENT

महिलांना असे पुरुष आवडतात जे एखाद्या गोष्टीवर त्यांची ठाम आणि स्वत:ची देखील भूमिका घेतात. जे चूक असेल त्याला चूक म्हणणं आणि जे बरोबर आहे त्याल बरोबर म्हणणं. हे महिलांच्या दृष्टीने योग्य असतं.

अनेकवेळा असे घडते की महिलांना प्रभावित करण्यासाठी पुरुष त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात. पण असे केल्याने तुम्ही कोणत्याही स्त्रीला काही दिवसांसाठीच संतुष्ट करू शकाल. पण त्यानंतर समोरच्या व्यक्तीला असे वाटेल की, तुमचे स्वतःचे काही मतच नाही आणि तुम्ही फक्त त्यांचे होकाराला होकार देण्याचं काम करत आहात. त्यामुळे असं काही असेल तर तुमची ही सवय जरुर बदला.

लहान मुलासारखं अजिबात वागू नका:

तुम्ही दिसण्यास कितीही आकर्षक असाल याने काही फरक पडत नाही. पण तुमचं वागणं हे अगदीच लहान मुलासारखे असेल तर महिला तुम्हाला अजिबात पसंत करणार नाहीत.

महिलांना पुरुषांवर अवलंबून राहणे आवडत नाही. त्यामुळे त्यांचा जोडीदार जर लहान मुलासारखा बोलत असेल किंवा वागत असेल तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही या सवयी सुधारणे गरजेचे आहे.

नेहमी उपदेश देणारे:

केवळ स्त्रियाच नव्हे, तर पुरुषही अशा मुलांचा तिरस्कार करतात जे त्यांचे ज्ञान वाटत फिरतात आणि आपण काही तरी वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी सर्वत्र त्याच गोष्टीचा प्रचार करत असतात.

आयुष्यात लोकांना फक्त आनंद घेणे आवडते. अशा परिस्थितीत जे लोक पूर्णवेळ केवळ उपदेश देत फिरतात त्या लोकांविषयी विशेषत: महिलांना खूपच चीड येते. त्यामुळे असे पुरुष महिलांना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे अशा सवयीत बदल करणं गरजेचं आहे.

‘तूच हृदयात… तूच श्वासात’ व्हॅलेंटाईनच्या दिवशीचा अमृता फडणवीस यांचा फोटो आणि ट्विट चर्चेत

विनाकारण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न चुकीचा:

काही मुलांची सवय असते की ते, सर्वांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांची इच्छा असते की त्यांचा जोडीदार देखील नेहमी त्यांच्याच नियंत्रणात असावी. जर तुम्हीही असे असाल तर आम्ही आपल्याला सांगतो की, मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाहीत. सध्याच्या युगात प्रत्येक मुलगी ही स्वत: कर्तृत्वावर पुढे जात आहे. जगातील अनेक चांगल्या वाईट गोष्टींची तिला जाण आहे. त्यामुळे आता मुली आपल्या अटींवर जगणं पसंत करतात. अशावेळी जर त्यांचा जोडीदार त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करु लागला तर मात्र त्यांना ती गोष्ट अजिबात खपत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT