Tauktae Cyclone- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विमानसेवा बंद
अरबी समुद्रामध्ये घोंगावणाऱ्या तौकताई चक्रीवादळाचा रविवारी रत्नागिरी तसंत सिंधुदूर्ग या ठिकाणी पहायला मिळाला. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी सकाळी सांगितलं की, चक्रीवादळ तौकताई अत्यंत तीव्र स्वरूपाचं वादळ आहे. तौकताई चक्रीवादळ गोव्यापासून काही किमी अंतरावर आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पाठोपाठ आता या वादळाचा फटका गुजरातलाही बसण्याची शक्यता […]
ADVERTISEMENT
अरबी समुद्रामध्ये घोंगावणाऱ्या तौकताई चक्रीवादळाचा रविवारी रत्नागिरी तसंत सिंधुदूर्ग या ठिकाणी पहायला मिळाला. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी सकाळी सांगितलं की, चक्रीवादळ तौकताई अत्यंत तीव्र स्वरूपाचं वादळ आहे.
ADVERTISEMENT
तौकताई चक्रीवादळ गोव्यापासून काही किमी अंतरावर आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पाठोपाठ आता या वादळाचा फटका गुजरातलाही बसण्याची शक्यता आहे. गुजरातच्या महुआ गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हे वादळ 18 मे रोजी सकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. गुजरातला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून 490 ते गुजरातपासून 730 किमी लांब आहे.
CycloneAlert for Gujarat & Diu coasts: VSCS Tauktae to cross Gujarat coast between Porbandar & Mahuva (Bhavnagar district) around 18thMay early morning. At 1130 hoursIST of today,it lay near 15.7°N/72.7°E, about 120 km west-northwest of Panjim-Goa,380 km south-southwest of Mumbai pic.twitter.com/s1P2Hkri9D
— India Meteorological Department (@Indiametdept) May 16, 2021
दरम्यान गोव्यामध्ये तौकताई वादळामुळे विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्याची विमानसेवा बंद राहणार असल्याची माहिती आहे. तौकतई वादळामुळे गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात होऊन अनेक ठिकाणी झाड आणि इलेट्रीक पोल कोसळले आहेत.
हे वाचलं का?
Tauktae Cyclone Live: पुढील काही तास महत्त्वाचे, तौकताई चक्रीवादळाचं होणार ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ रुपांतर
तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT