Mumbai Rain : आनंदाची बातमी ! शहराला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरुन वाहू लागला आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्याच्या दरम्यान विहार तलाव भरुन वाहू लागल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. गेल्यावर्षी विहार तलाव भरण्यासाठी ५ ऑगस्ट ही तारीख उजाडावी लागली होती. २०१८ आणि २०१९ मध्ये हा तलाव जुलै महिन्यातच भरला होता.

ADVERTISEMENT

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा शहराला केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Mumbai Rain : पावसाची जोरदार बॅटींग, मुंबई पुन्हा कोलमडली

हे वाचलं का?

काय आहेत विहार तलावाची प्रमुख वैशिष्ट्य –

  • बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

ADVERTISEMENT

  • या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.

  • ADVERTISEMENT

  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.

  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.

  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT