ठाकरे सरकारची उद्याच ‘बहुमताची परीक्षा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पत्रात काय म्हटलंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात सुरू असलेल्या घडामोडी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्या आहेत. ठाकरे सरकारचं काय होणार असा प्रश्न सगळीकडेच चर्चिला जात असून, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी उद्याच (३० जून) अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानं सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले होते. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील राजकारण याच भोवती फिरत असून, सरकारच्या भवितव्याबद्दलची महत्त्वाची घडामोड घडली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र पाठवण्यात आलं असून, गुरूवारी, ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?

– महाराष्ट्रातील राजकीय चित्र व्यथित करणारं आहे. वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्यांमधून असं दिसंतय की, शिवसेनेच्या ३९ आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका आहे. त्याचबरोबर राजभवनाला ७ अपक्ष आमदारांनीही पत्र पाठवलं असून, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात बहुमत गमावलं असून, लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्यात यावी.

ADVERTISEMENT

– विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही माझी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावलं आहे. लोकशाही विरोधी गोष्टी होऊ नये म्हणून लवकर बहुमत चाचणी घेण्याचं त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

– ३९ आमदारांविरोधात मुंबईसह राज्यात हिंसक घटना घडत असून, त्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहे.

– राज्यातील घटनात्मकप्रमुख म्हणून मी मुख्यमंत्र्यांना उद्या, ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. बहुमत चाचणीसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, यासाठी सर्व व्यवस्था करण्यात यावी.

– मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या बहुमत चाचणीसाठी ३० जून रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे आणि ही सर्व प्रक्रिया ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे संपवण्यात यावी.

– नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्य लक्षात घेऊन विधान भवनाबाहेर आणि विधान भवनातही पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी. बहुमत चाचणी कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी.

– मुक्त वातावरणात ही प्रक्रिया पार पडण्यासाठी आमदारांना जागेवर उभं करून मतमोजणी करण्यात यावी. ही प्रक्रिया ३० रोजी पूर्ण करण्यात यावी. कोणत्याही कारणास्तव ती स्थगित करू नये. त्याचबरोबर बहुमत चाचणीचं चित्रीकरण करण्यात यावं आणि माझ्याकडे सादर करण्यात यावं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT