सत्तानाट्याच्या महाभारतानंतर उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सत्तानाट्याच्या महाभारतात मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. मात्र यानंतर अवघ्या दोन दिवसात त्यांना एक मोठा दिलासाही सीबीआयकडून मिळाला आहे. उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना आरोपी बनवण्यात आलेल्या प्रकरणी सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं मान्य केला आहे.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरे मैदानात, १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

त्यामुळे या प्रकरणातील तपास थांबवण्यास सेशन्स कोर्टाने विशेष सीबीआय कोर्टानं केंद्रीय तपासयंत्रणेला हिरवा कंदिल दाखवला आहे. चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित पुष्पक बुलियनवरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपात हे प्रकरण समोर आलं होतं. नोटबंदीच्या काळात बुलियन कंपनी आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यात झालेले काही व्यवहार चौकशीच्या रडारवर होते. तब्बल 84.6 कोटींच्या नोटा पुष्पक बुलियनच्या विविध खात्यात जमा करण्यात आल्या होत्या.

हे वाचलं का?

त्यानंतर यातून सोनं खरेदी करून हा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याच खात्यातील काही रक्कम श्रीधर पाटणकर यांच्या ‘श्री साईबाबा गृहनिर्मिती’ या कंपनीत वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. याच पैशातून कंपनीच्यामार्फत पाटणकर यांनी ठाण्यातील ‘निलांबरी’ सोसायटीत 11 सदनिका विकत घेतल्याचा आरोप करत सीबीआयनं साडे सहा कोटींची ही मालमत्ता जप्त केली होती.

याप्रकरणी तपासाअंती आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडत नसल्यानं हा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयच्यावतीनं कोर्टात सादर करण्यात आला. या रिपोर्टला ईडीने विरोध केला होता. आमचाही तपास याच दिशेनं सुरूय त्यामुळे हा रिपोर्ट स्वीकारल्यास आमच्या तपासावरही थेट परिणाम होईल असा दावा करण्यात आला.

ADVERTISEMENT

मात्र मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा दावा फेटाळून लावला. यापूर्वी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी होत्या, त्यामुळे आम्ही तो अमान्य केला होता. मात्र आता आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तपासयंत्रणेने दिली आहेत, त्यामुळे दोघांनी एकाच प्रकरणाचा तपास करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही असं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

ADVERTISEMENT

श्रीधर पाटणकरांवर ईडीची कारवाई; राऊत म्हणाले, ‘आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार’

२२ मार्च २०२२ ला काय घडलं होतं?

ईडीने प्रेस रिलीज काढलं होत, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. याचा अर्थ या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार श्रीधर पाटणकर करु शकणार नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे. जी केस होती ईडी होती ती पुष्पक बुलियन नावाची कंपनी आहे त्या संदर्भातील ही केस होती. त्याच संदर्भात 11 फ्लॅट्स ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील फ्लॅट्स जप्त केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT