विरारच्या गर्दीत आई–मुलाची ताटातूट, लग्नपत्रिका वाटायला आलेल्या नवरदेवाने घडवली दोघांची भेट
विरार रेल्वे स्टेशन आणि विरार लोकलची गर्दी हा आता संपूर्ण मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा या गर्दीत लोकांची चुकामूक झाली आहे. विरार रेल्वे स्टेशनमध्ये आज एक हृदयस्पर्शी प्रसंग पहायला मिळाला. आपल्या लग्नाच्या पत्रिका पाठवायला बाहेर पडलेल्या मुलाने विरार रेल्वे स्टेशनध्ये ताटातूट झालेल्या सात वर्षाच्या मुलाची त्याच्या आईसोबत भेट घालून दिली आहे. ध्रुव आशिष पाटील […]
ADVERTISEMENT
विरार रेल्वे स्टेशन आणि विरार लोकलची गर्दी हा आता संपूर्ण मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा या गर्दीत लोकांची चुकामूक झाली आहे. विरार रेल्वे स्टेशनमध्ये आज एक हृदयस्पर्शी प्रसंग पहायला मिळाला. आपल्या लग्नाच्या पत्रिका पाठवायला बाहेर पडलेल्या मुलाने विरार रेल्वे स्टेशनध्ये ताटातूट झालेल्या सात वर्षाच्या मुलाची त्याच्या आईसोबत भेट घालून दिली आहे.
ADVERTISEMENT
ध्रुव आशिष पाटील (वय 7) हा आपल्या आईसोबत आजोळी जायला निघाला होता. आजोळी जाऊन आल्यानंतर घरी परतताना ध्रुव पाटीलची विरार रेल्वे स्थानकात त्याच्या आईसोबत चुकामूक झाली. ध्रुव सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने स्टेशनवर त्याला शोधायला सुरुवात केली. परंतू ध्रुव सापडला नसल्यामुळे ध्रुवच्या आईच्या चिंतेत आणखीनच भर पडली.
रायगड जिल्ह्यातला तरुण प्रसाद विकास जोरे हा याच वेळेला आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी विरार रेल्वे स्टेशनमध्ये आला होता. विरार रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर उतरून विरार पूर्वेला जाण्यासाठी प्रसाद जोरे रेल्वे पूल चढत असताना पाठीमागून ध्रुवने प्रसादचा हात पकडला. यावेळी अचानक एका लहान मुलाने आपला हात पकडल्यामुळे प्रसादही भांबावून गेला. त्याची चौकशी केली असता ध्रुवने आपलं नाव प्रसादला सांगितलं आणि आपली आई सापडत नसल्याचं सांगितलं. हे समजताच प्रसादने आपली दक्ष नागरिकाची भूमिका बजावत रेल्वे स्टेशनमास्टर कार्यालय गाठलं.
हे वाचलं का?
रेल्वे अधिकाऱ्यांनी ध्रुवची चुकामूक झाल्याचं लक्षात येताच तात्काळ याबद्दलची घोषणा करायला सुरुवात केली. सुदैवाने ध्रुवबद्दलची ही घोषणा त्याच्या आईने ऐकली आणि तिने तात्काळ स्टेशन मास्तरांचं कार्यालय गाठत आपल्या मुलाला ताब्यात घेतलं. ध्रुवला पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आजकालच्या जगात आपलं हातातलं काम सोडून जबाबदारीने इतरांच्या कामाला येणाऱ्या या तरुणाचे रेल्वे अधिकाऱ्यांसह ध्रुवच्या आईने आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT