Gujrat : मतदान 3 दिवसांवर असताना ‘आप’चा आमदारकीचा उमेदवारच फुटला! भाजपला दिला पाठिंबा
गांधीनगर : दिल्ली आणि पंजाबपाठोपाठ गुजरात जिंकायला निघालेल्या आम आदमी पक्षाला मतदानाला अवघे ३ दिवस शिल्लक असतानाचा मोठा धक्का बसला आहे. कच्छ जिल्ह्यातील अबडासा मतदारसंघातील आपचे अधिकृत उमेदवार वसंत वालजीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. इतकचं नाही तर इथून त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारालाही पाठिंबा जाहीर केला आहे. #AamAadmiParty's Abdasa constituency candidate #VasantKhetani has withdrawn […]
ADVERTISEMENT
गांधीनगर : दिल्ली आणि पंजाबपाठोपाठ गुजरात जिंकायला निघालेल्या आम आदमी पक्षाला मतदानाला अवघे ३ दिवस शिल्लक असतानाचा मोठा धक्का बसला आहे. कच्छ जिल्ह्यातील अबडासा मतदारसंघातील आपचे अधिकृत उमेदवार वसंत वालजीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. इतकचं नाही तर इथून त्यांनी थेट भाजपच्या उमेदवारालाही पाठिंबा जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT
#AamAadmiParty's Abdasa constituency candidate #VasantKhetani has withdrawn from the Assembly elections and joined the #BJP candidate.
A video clip of him making the announcement has surfaced. pic.twitter.com/fDUDbcaoxJ
— IANS (@ians_india) November 28, 2022
वसंत वालजीभाई खेतानी यांनी एक व्हिडिओ जारी करुन याबाबत माहिती दिली. राष्ट्रहितासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच भाजप उमेदवार प्रद्युमन सिंह जडेजा यांना पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी केलं. यापूर्वी सुरतमध्येही आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला होता. सुरतमधील पक्षाचा अधिकृत उमेदवार कांचन जरीवाला यांनीही अशाच पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
हे वाचलं का?
गुजरातमधून भाजपचं सरकार जाणार! अरविंद केजरीवाल यांचा दावा :
एका बाजूला अधिकृत उमेदवार पक्ष सोडून विरोधी पक्षात जात असल्याचं चित्र असताना दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये भाजप सत्तेबाहेर जात असून आम आदमी पक्षा सत्तेत येत आहे, अशी लिखीत भविष्यवाणी केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आम आदमी पक्षाच्या बाजूने असलेल्या या वातावरणामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. रस्त्यावर कुणालाही विचारा, तो मतदार भाजप किंवा आपला मत देणार असल्याचं सांगतो. पण भाजपला मत देणाऱ्यांशी ५ मिनिट संवाद साधल्यानंतर तो सांगतो, मी आणि माझा संपूर्ण मोहल्ला आपलाच मत देणार आहे, पण जाहीरपणे नाव घ्यायला आम्हाला भीती वाटते. हेच कारण आहे की भाजपमध्ये अगदी वाईट पद्धतीने अस्वस्थता पसरली आहे.
ADVERTISEMENT
गुजरात पहिलं असं राज्य आहे, जिथं सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतो. त्याला भाजपचे लोक मारतील असं वाटतं, असाही दावा केजरीवाल यांनी केला. ते पुढे म्हणाले, काँग्रेसचा मतदार शोधूनही सापडत नाही. यावेळी भाजपचं मोठ्या प्रमाणावरील मतदान ‘आप’ला होणार आहे. माझा राजकीय अंदाज खरा आतापर्यंत खरा ठरला आहे. त्यामुळे मी पुन्हा लिहून देतो की गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT