हार्दिक पटेलांच्या हाती कमळ तरीही नेटकरी का म्हणत आहेत भूतकाळ पाठ सोडत नाही?
एकेकाळी गुजरातच्या पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल यांनी व्हाया काँग्रेस आता अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये गुजरातमध्ये जे पाटीदार आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या वेळी जर कुणाला सांगितलं असतं की भविष्यात हार्दिक पटेल भाजपमध्ये जातील तर कुणीच विश्वास ठेवला नसता. मात्र राजकारणात काहीही शक्य […]
ADVERTISEMENT

एकेकाळी गुजरातच्या पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल यांनी व्हाया काँग्रेस आता अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी दुपारी 12 वाजता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये गुजरातमध्ये जे पाटीदार आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या वेळी जर कुणाला सांगितलं असतं की भविष्यात हार्दिक पटेल भाजपमध्ये जातील तर कुणीच विश्वास ठेवला नसता. मात्र राजकारणात काहीही शक्य असतं, हेच हार्दिक पटेल यांच्या कृतीने दाखवून दिलं आहे.
गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षीच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे सूचक आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांना सोबत घेऊन काँग्रेसने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
हार्दिक पटेल यांनी स्वतःला आता भाजपचा सैनिक म्हटलं आहे. तसंच भाजप, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या विरोधातले सगळे ट्विट डिलिट कऱण्याची खबरादारीही घेतली आहे. असं सगळं असलं तरीही हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश हा नेटकऱ्यांना काही रूचलेला नाही. नेटकरी ट्विटरवर हार्दिक पटेल यांची शाळा घेतली आहे. भूतकाळ पाठ सोडत नाही असं म्हणत हार्दिक पटेल यांना नेटकऱ्यांनी का सुनावलं आहे आपण जाणून घेणार आहोत.
माँ भारती के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र भाई मोदी, मक्कम गृहमंत्री श्री अमित भाई शाह एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के नेतृत्व में राष्ट्रहित, प्रदेशहित, जनहित एवं समाजहित का काम करने के लिए आज भारतीय जनता पार्टी में शामिल हुआ हूँ। pic.twitter.com/0tqGxH7qy4
— Hardik Patel (@HardikPatel_) June 2, 2022
हार्दिक पटेल यांनी भाजपविरोधातली ट्विट डिलिट केली आहेत. मात्र त्याचे स्क्रिन शॉट वापरत नेटकऱ्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.









