कट्टर शिवसैनिक ते मुख्यमंत्री… कसा होता राणेंचा Shiv Sena मधील प्रवास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

नारायण राणेंचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला होता. पण त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईतच गेलं.

अगदी कमी वयातच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता.

हे वाचलं का?

बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेले राणे चेंबूरमध्ये शाखाप्रमुख होते. नंतर ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.

1985 साली राणेंना मुंबईच्या महानगरपालिकेत बेस्ट समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून राणे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

ADVERTISEMENT

1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर राणेंकडे उद्योग खात्यासह अनेक खाती देण्यात आली होती.

1997 साली बाळासाहेबांनी राणेंकडे अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं महसूल खातं देखील सोपावलं होतं.

इथूनच नारायण राणेंचा शिवसेनेत प्रचंड दबदबा निर्माण झाला होता.

यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. बाळासाहेब ठाकरेंनीच त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT