हृदयनाथ मंगेशकरांना खरंच आकाशवाणीतून काढून टाकलं का? जाणून घ्या काय म्हणाले होते हृदयनाथ मंगेशकर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं किती अन्याय केला याची वेगवेगळी उदाहरणं दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना त्यांनी काँग्रेसला अनेक चिमटे काढले. याच पार्श्वभूमीवरही बोलताना मोदी म्हणाले की, ‘लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर ( Pt. Hridaynath Mangeshkar) यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रसारित केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं.’ आता मोदींच्या या वक्तव्यावरुन नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मात्र, हृदयनाथ मंगेशकरांसोबत खरोखरच असं काही झालं होतं का? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

सर्वात आधी पाहूयात पंतप्रधान मोदी हे याबाबत नेमकं काय म्हणाले:

‘लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालय. पण लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होतं. पण त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.. हे देखील देशाला समजलं पाहिजे. लता दीदींचे छोटे भाऊ पंडीत हृदयनाथ मंगेशकरजी.. गोव्याचा सुपुत्र. त्यांना ऑल इंडियो रेडिओमधून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं..’

हे वाचलं का?

‘त्यांचा गुन्हा काय होता? त्यांचा गुन्हा हा होता की, त्यांनी वीर सावरकर यांची एक कविता ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित केली होती. हृदयनाथजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांची मुलाखत उपलब्ध आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितलं की, मी जेव्हा सावरकरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की, तुमच्या कवितेवर एक गाणं बनवायचं आहे तेव्हा सावरकरजी म्हणाले. माझी कविता गाऊन तुम्हाला काय तुरुंगात जायचं आहे का?’

‘तरीही हृदयनाथ यांनी त्यांची कविता संगीतबद्ध केली त्यानंतर आठ दिवसाच्या आत त्यांना ऑल इंडियामधून काढून टाकण्यात आलं. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?’ असा आरोप मोदींनी राज्यसभेत बोलताना केला.

ADVERTISEMENT

खरंच हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीतून काढून टाकलेलं?

ADVERTISEMENT

हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीमधून काढून टाकण्यात आलेलं? हा मोदींनी केलेला आरोप खरा की खोटा याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी एबीपी माझा या न्यूज चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांची आकाशवाणीमधील नोकरी कशी गेली होती याबाबत भाष्य केलं होतं. जाणून घेऊयात त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी नेमकं काय म्हटलं होतं.

…ते गाणं प्रसारित झालं अन् 8 व्या दिवशी माझी नोकरी गेली!

‘मी संगीतात अनेक प्रयोग केले. पहिला प्रयोग म्हणजे माझं काम गेलं आहो.. मी आकाशवाणीवर काम करत होतो. आकाशवाणीवर 1955 साली पगार किती होता मला माहितीये तुम्हाला? तब्बल 500 रुपये. आज 500 रुपये आपल्याला फार छोटे वाटतात. 55 साली 500 रुपये म्हणजे.. त्यावेळी माणूस राजा असायचा. वय किती होतं तेव्हा माझं तर 17 वर्ष. त्यावेळी पहिलं गाणं केलं होतं मी ते ‘तिन्ही सांजा सखे’ हे. हाच पहिला प्रयोग आहे माझा मोठा.’

‘मला त्यांनी पहिल्यांदा गाणं दिलं होतं ते किती रे दिन झाले.. भेटीगाठी.. मी म्हटलं नाही रे भेटीगाठी होतायेत.. पण ते लोकं मोठे लोकं होते. तिथे जो माणूस प्यून होता म्हणजे मोठ्या अधिकाऱ्याचा कागद दुसऱ्या अधिकाऱ्याकडे नेणारा माणूस म्हणून.. त्या माणसाचं नाव ‘आरती प्रभू’ चिं. त्र्यं. खानोलकर.. हे पु. लं. देशपांडेंचा कागद मंगेश पाडगावकरांना नेऊन द्यायचे. हा स्तर होता वैचारिक. त्यामुळे तिन्ही सांजा घेतलं त्यांनी. असं काळ नागिणी घेतलं, चांदणं शिंपित जाशी ही गाणी घेतली आकाशवाणीवर. त्यामुळे मी फार खुश झालो स्वत:वर.’

जाणून घ्या लता दीदींच्या पार्थिवाला मुखाग्नि देणारे त्यांचे धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकरांविषयी

‘ही सगळी गाणी चालली, पगार मिळत होता. खाँसाहेबांनी रियाज सांगितलेला तो रियाज सुटला आपोआपच. रियाज ही गोष्ट आहे की, जरा आराम मिळाला ना की, माणूस लगेच तंबोऱ्याला विसरतो. खाँसाहेब माझ्याकडे असं बघायचे की, मी गाणं शिकवतोय आणि तू पैसे कमावतोय.’

‘याच दरम्यान, माझ्या आयुष्यातील एक मोठा प्रयोग केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.. (तात्या) यांच्याकडे गेलो एक दिवस. त्यांना म्हणालो की, ‘तुम्ही तर एवढे मोठे महाकवी तुमची एखादी कविता द्या ना मला चाल लावायला.’ ते मला म्हणाले की, ‘तुला काय कारागृहात जायचंय का?’ त्यांना म्हटलं की, ‘तुमच्या कवितेला चाल लावली तर मी कारागृहात का जाईन?’ ते पुढे एवढंच म्हणाले की, ‘येईल तुला अनुभव.’ मग म्हणाले ‘कुठली कविता हवी आहे तुला.’ म्हटलं तुम्हीच द्या निवडून एखादी. तर त्यांनी मला कविता दिली. ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला.’

‘त्यांच्या या कवितेला चाल लावली.. ध्वनीमुद्रित केली.. खुश झाले सगळे. दुसऱ्या दिवशी मेमो आला हातात. कारणं दाखवं नोटीस आली. तर दोन कारणं मी दाखवली.. ‘फार मोठा कवी.. फार मोठी कविता’.. त्यांनी पण मला एक कारण दिलं. ‘फार मोठा रस्ता…’

काँग्रेस नसती तर? काय झालं असतं पंतप्रधानांनी यादी वाचत चालवले टीकेचे बाण

‘हे गाणं आकाशवाणीवर प्रसारित झाल्याच्या 8 व्या दिवशी मी बाहेर. नोकरी गेल्यावर मी फार उदास झालो. रडत होतो. त्यावेळी आकाशवाणी आता आहे तिथे नव्हती. त्यावेळी ते चर्चगेटला होतं. चर्चगेटच्या जवळ होतं. तिथून मी चालत निघालो ते आमच्या खाँसाहेबांच्या घरी आलो. खाँसाहेब म्हणाले तुझं तोंड का एवढं उतरलेलं आहे? मी म्हणालो… खाँसाहेब नोकरी गेली!’

‘ते म्हणाले.. अरे मुबारक हो.. मुबारक हो.. खूप चांगलं झालं. म्हटलं खाँसाहेब आपण असं बोलताय. म्हणाले अब कोई गानेवाला बनेगा.. अब कोई म्युझिक बनेगा.. नही तो अच्छा ऑफिसर बन जाते… पर रहने दो..’

‘या सगळ्या प्रकारामुळे माझी आकाशवाणीत फक्त तीनच महिने नोकरी झाली. 500-500 असे दीड हजार रुपये मिळाले फक्त!’ असं स्वत: हृदयनाथ मंगेशकर यांनी मुलाखतीत सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT