Rain Alert : मुंबई-पुण्यासह राज्याला अवकाळी झोडपणार; मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, याचा परिणाम राज्याच्या काही भागात दिसून येणार आहे. वाऱ्याचा वेग वाढणार असून, मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणं, मध्य महाराष्ट्र आणि […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, याचा परिणाम राज्याच्या काही भागात दिसून येणार आहे. वाऱ्याचा वेग वाढणार असून, मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
राज्यात पुढील तीन दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणं, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटरवर पोहोचण्याची अंदाज असून, 1 आणि 2 डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळ, तर 2 आणि ३ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?
कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन राज्यातील कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज (30 नोव्हेंबर) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढणार आहे.
ADVERTISEMENT
1 डिसेंबरला पावसाची व्याप्ती वाढणार
ADVERTISEMENT
उद्या (1 डिसेंबर) पावसाची व्याप्ती वाढणार असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
29/11;महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 Dec ला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. हि सिस्टिम येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सशी मिळून,त्याचा प्रभावी राज्यात काहि ठिकाणी 30 Nov-2 Dec मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता.काही ठिकाणी हलका पाऊस.
-IMD pic.twitter.com/XFcrDQGH13— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 29, 2021
2 डिसेंबरला असं असेल हवामान…
2 डिसेंबरला मुंबई पावसाची शक्यता नाही. मात्र जवळच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT