हिंगोली: शेतीच्या वादातून हत्या, दुहेरी हत्याकांडात 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली

ADVERTISEMENT

हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावात चार वर्षांपूर्वी शेतीच्या वादातून बाप लेकाचा धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याच प्रकरणी सोमवार (29 नोव्हेंबर) हिंगोली अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जामठी (खुर्द) येथे अंबादास आबाजी भवर, प्रल्हाद आबाजी भवर आणि रामप्रसाद आबाजी भवर यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु होता.

हे वाचलं का?

22 जानेवारी 2016 रोजी शेत नांगरणी केल्याच्या करण्यावरून पुन्हा वाद झाला. वादाचं स्वरूप बदलून हाणामारीत झालं. यामध्ये आंबादास भवर, उद्धव भवर, संजय भवर यांना कुऱ्हाड, तलवारीने मारहाण करण्यात आली होती. यावेळी आंबादास भवर आणि उद्धव भवर यांचा दवाखान्यात दाखल करते वेळी रस्त्यातच मृत्यू झाला होता.

संजय भवर यास नांदेड येथे उपचारास दाखल करण्यात आले होते. यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अयोध्याबाई उद्धव राव भवर यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात 302 कलमांप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

ADVERTISEMENT

बारामती : हातावर असलेल्या टॅटूवरुन पोलिसांनी आरोपीला केली अटक

ADVERTISEMENT

याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कारेगावकर यांनी तपास करून 10 आरोपी विरोधात दोषारोप हिंगोली जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.

सदर प्रकरणात न्यायाधीश. पी. व्ही. बुलबुले यांच्या समक्ष हे प्रकरण चालविण्यात आले. त्यामध्ये सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी फिर्यादीच्या वतीने 18 साक्षीदारांची साक्ष जबाब घेतले होते. साक्ष जबाब झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून 10 पैकी 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुजानबाई भवर यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे.

हिंगोलीतील हत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपींना अटक केली होती. मात्र, आता जवळजवळ सहा वर्षाने या प्रकरणाचा निकाल लागला आहे. दरम्यान, आरोपींना कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून सातत्याने सुरु होती.

अखेर आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे आता याप्रकरणी दोषी आता हायकोर्टात जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT