मुंबईकरांनी २ वर्षांनंतर खेळली मनसोक्त धुळवड; कॅमेऱ्यानं टिपलेले खास फोटो पाहायलाच हवेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

दोन वर्षांपूर्वी जगभरात पाऊल ठेवलेल्या कोरोनाची जणू सण उत्सावांना नजरच लागली होती. कोरोनाच्या शिरकावापासून देशासह महाराष्ट्रात सर्वच सण उत्सव साधेपणानेच साजरे केले गेले. मात्र, अगदी काही महिन्यांपूर्वी झालेला गणेशोत्सवही!

हे वाचलं का?

अखेर बरोबर दोन वर्षांनी म्हणजे मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच मुंबईसह राज्यभर होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. इतक्या मोठ्या कालावधीनंतर सण साजरा करण्याची मोकळीक मिळाल्याने सगळी जणू आनंदाच उधाणच आल्याचं दिसलं.

ADVERTISEMENT

मुंबईकरांनीही धुळवडीचा हा उत्सव अगदी मनमोकळेपणाने आणि कोरोनाच्या भीतीविना साजरा केला. मुंबईतील विविध भागात सकाळपासूनच रंगांची उधळण सुरू झाली, ती उन्हं उलटून गेली तरी सुरूच होती.

ADVERTISEMENT

आबाल वृद्धांसह तरुण-तरुणी आणि गृहिणींनीही कामातून उसंत काढत एकमेकांना रंग लावत धुळवड साजरी केली. मुंबईकरांनी बेधुंदपणे साजऱ्या केलेल्या धुळवडीची मिलिंद शेल्टे यांनी कॅमेऱ्यात कैद केलेली ही क्षणचित्रे…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT