भाजपला दंगा करायची गरज नव्हती, फडणवीसांच्या जबाबासाठी केस थांबली – वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवरुन राज्यात पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. मुंबईत फडणवीसांच्या सागर या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली असून राज्यभरात विविध ठिकाणी सरकारने फडणवीसांना पाठवलेल्या नोटीशीची होळी करण्यात येते आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट करत, भाजपला या विषयावर इतका दंगा करायची काहीच […]
ADVERTISEMENT
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीवरुन राज्यात पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. मुंबईत फडणवीसांच्या सागर या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली असून राज्यभरात विविध ठिकाणी सरकारने फडणवीसांना पाठवलेल्या नोटीशीची होळी करण्यात येते आहे.
ADVERTISEMENT
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट करत, भाजपला या विषयावर इतका दंगा करायची काहीच गरज नव्हती असं म्हटलं आहे.
वळसे-पाटील यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधून सरकारची बाजू मांडली. “या प्रकरणात आपण परिस्थिती समजवून घेतली पाहिजे. गेल्या वर्षी गुप्त माहिती बाहेर आल्यामुळे सायबर पोलिसांमध्ये ५ अज्ञातांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. यातली काही माहिती ही गोपनीय असल्यामुळे Official Secret act नुसार गुन्हा नोंद झाला. आतापर्यंत २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या घटनेशी संबंधित ज्या-ज्या व्यक्ती आहेत त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. फडणवीसांना पोलिसांनी मागच्या वर्षात चार वेळा आणि यंदाच्या वर्षात दोन नोटीस बजावल्या…आणि ही नोटीस आहे, समन्स नाही. त्यांच्याकडे पोलिसांनी काही प्रश्नावली पाठवली होती, ज्याची उत्तर त्यांना द्यायची होती”. यात काहीही गैर नसल्याचं वळसे-पाटलांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
फडणवीसांच्या नोटीशीवरुन भाजपने राज्यात आंदोलन केलं आहे. यावर बोलताना वळसे पाटलांनी, आपल्याकडे राजकीय भांडवलं करणं हे सुरुच असतं. भाजपला यात दंगा करायची गरज नव्हती. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नव्हती. त्यांच्या जबाबामुळे तपास थांबला होता म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान दोन तासांच्या चौकशीनंतर सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी फडणवीसांच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात या घटनेचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Devendra fadnavis : फडणवीसांची दोन तास चौकशी; जबाब नोंदवून मुंबई पोलीस परतले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT