चंद्रपूर: गायीला वाचवताना बोलेरोचा भीषण अपघात, डीजे पंकज बागडेसह चौघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे (वय-26) याचा मृतांमध्ये समावेश आहे. बोलेरो वाहनांतील व्यक्ती चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी करून गडचिरोलीला परतत होते. रात्री रस्त्यावर बसलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी वळवत असताना हा अपघात झाला

ADVERTISEMENT

गायीला वाचवण्याच्या वेळी गाडी वळण घेत असताना अपघात

अचानक बोलेरो वाहनाचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. मोठा आवाज ऐकून घटनास्थळी सावली आणि किसन नगर येथील नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात डीजे पंकज बागडे सह चार जणांचा मृत्यू झाला.

काय आहेत मृतांची नावं?

१) पंकज किशोर बागडे (वय 26 रा.गडचिरोली)

हे वाचलं का?

२) अनुप रमेश ताडूलवार (वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली)

३) महेश्ववरी अनुप ताडूलवार (वय 24 वर्ष रा.विहीरगाव)

ADVERTISEMENT

४) मनोज अजय तीर्थगिरीवार (वय 29 रा.ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली)

ADVERTISEMENT

या चौघांचा या अपघातात मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम वय 23 वर्ष रा.चिखली ता.सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले आहेत. सावली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

रस्त्यावर बसलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात

चंद्रपूरमध्ये घडलेल्या अपघातात रस्त्यावर असलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी तपास करत असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितानुसार, गडचिरोली इथले पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीर गाव येथील अनुप ताडूलवार या आपल्या मित्रासोबत चंद्रपूर इथं डिजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बोलेरो गाडीने निघाले होते.

साहित्य खरेदी केल्यावर गावाकडे येत असताना सावली तालुक्यातील किसानगर इथे मुख्य मार्गावर गाय बसलेली होती.तिला वाचवण्याचा प्रयत्नात बेलोरो वाहनाच्या स्टेरिंगचा राळ तुटला आणि मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहीती सावली पोलीसांना देण्यात आली आहे.ठाणेदार आशिष बोरकर यांनी घटनास्थळ दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना बाहेर काढले. जखमीला सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT