नागपुरात निष्काळजीपणाचा कळस, जिवंत महिलेचे कोविड रुग्णालयाने दिले डेथ सर्टिफिकेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाबाधित महिला रुग्णाला जिवंत असताना मृत घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. पार्थिवाचा चेहरा दाखवल्यानंतर मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचं उघकीस आलं. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी अंत्यसंस्काराचीही तयारी केली होती. नागपुरातील डोंगरगाव इथल्या आय.जी.पी.ए हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कोविडालय या हेल्थ सेंटरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.

ADVERTISEMENT

नागपुरातील काशी नगर इथे राहणाऱ्या 63 वर्षीय आशा मून यांचा कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी पॉझिटीव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना डोंगरगावमधील रुग्णालयात भरती करण्यात आलं. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी आठ वाजता आशा मून यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी रुग्णालयाने घरच्यांना दिली.

हे वाचलं का?

ही बातमी ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. तातडीने सर्व नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचं मृत्यूचं प्रमाणपत्र देखील नातेवाईकांना सुपूर्त केलं. यावेळी आशा मून यांच्या नातेवाईकांनी जेव्हा मृतदेहाचा चेहरा दाखवण्याची अट घातली तेव्हा बॅगमध्ये असलेला मृतदेह हा आपला नातेवाईकाचा नव्हे असे लक्षात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी मून यांना अॅडमिट केलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी आशा मून चक्क आपल्या बेडवर बसून असल्याचं दिसून आलं.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची रुग्णाच्या नातेवाईकांनी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार केलीये. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस पुढील चौकशी करतायत. या संपूर्ण प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाने मात्र हा प्रकार घाईगडबडीने आणि चुकीने झाला असल्याचं मान्य केलंय. परंतु या प्रकरणात रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT