लॉकडाउनचा फटका : हॉटेल व्यवसायिकांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. या काळात अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल व्यवसायिकांना या काळात फक्त होम डिलेव्हरी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू या लॉकडाउनचा फटका राज्यातील हॉटेल व्यवसायिकांना बसायला लागला आहे. यासाठी हॉटेल व्यवसायिकांच्या एका शिष्ठमंडळाने राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत – काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा आरोप

या बैठकीत हॉटेल व्यवसायिकांनी लॉकडाउन काळात होणारं आर्थिक नुकसान व इतर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती शरद पवारांना दिली. याआधीही कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करत असताना हॉटेल व्यवसायिकांना चांगलाच फटका सहन करावा लागला होता. या शिष्ठमंडळाशी भेट झाल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हॉटेल व्यवसायिकांना काही स्वरुपातल्या सवलती देण्याबद्दल पत्र लिहीलं आहे.

हे वाचलं का?

या पत्रात शरद पवार यांनी FL-3 परवानाधारक आणि परमीट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हप्त्यांमध्ये देण्याची सवलत द्यावी, वीज बिलात सूट, मालमत्ता करात सवलत अशा सवलती देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री या मागण्यांचा सहानुभूतीपूर्व विचार करतील अशी मला आशा आहे असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT