महिला वकील कशी बनली सोशल मीडिया स्टार, कोण आहे निधी चौधरी?
Social Media Star Nidhi Chaudhary: नवी दिल्ली: सोशल मीडियावर (Social Media) निधी चौधरी (Nidhi Chaudhary) ही महिला वकील खूप चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी वास्तू टिप्स देण्यामुळे. पण एवढंच नाही तर निधीने वकिली देखील केली आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. एकेकाळी निधी चौधरी दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिली केली आहे. त्यामुळे […]
ADVERTISEMENT
Social Media Star Nidhi Chaudhary: नवी दिल्ली: सोशल मीडियावर (Social Media) निधी चौधरी (Nidhi Chaudhary) ही महिला वकील खूप चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी वास्तू टिप्स देण्यामुळे. पण एवढंच नाही तर निधीने वकिली देखील केली आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. एकेकाळी निधी चौधरी दिल्लीच्या साकेत कोर्टात वकिली केली आहे. त्यामुळे तिच्या वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलीने न्यायपालिकेत जावे, परंतु निधी चौधरीने कंटेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला. (How Delhi’s female lawyer Nidhi Chowdhary became a social media star?)
ADVERTISEMENT
कोण आहे निधी चौधरी?
निधीने सांगितले की, तिचा जन्म दिल्लीत झाला होता, पण तिचे कुटुंब बिहारच्या मधुबनीचे आहे. ती म्हणाली की, ती जेव्हा कोर्टात जायची तेव्हाही लोक तिला फॅशनबद्दल प्रश्न विचारायचे, तिने ही बॅग कुठून आणली किंवा ही साडी कुठून आणली?
निधी चौधरी अध्यात्म, ज्योतिष, वास्तूशी संबंधित व्हिडीओ बनवते तसेच फॅशन आणि सौंदर्याच्या टिप्स देते. यूट्यूबवर तिचे 5 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही तिचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
हे वाचलं का?
ब्लाउजशिवाय साडी नेसल्यामुळे झालेली ट्रोल
निधी चौधरीचे व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. एकदा तर लोकांनी तिला खूप ट्रोल केले होते जेव्हा लोकांना वाटलेले की निधी चौधरी ब्लाउजशिवाय साडी नेसून ज्योतिषाच्या टिप्स देत आहे. एवढंच नव्हे तर त्यावेळी अनेक लोकांनी निधीला ब्लाउज खरेदी करण्यासाठी पैसेही ट्रान्सफर केले होते.
ADVERTISEMENT
Viral Video : बुलेटच्या पेट्रोल टाकीवर मुलगी, मागे ड्रायव्हर… रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल
ADVERTISEMENT
निधी चौधरीने सांगितले की, 2016 मध्ये ती आजारी पडली होती. त्यामुळे तिला 3 महिने अंथरुणावर खिळून राहावं लागलं होतं. यादरम्यान तिने सौंदर्य आणि त्यासंबंधी टिप्स लिहिण्यासाठी ब्लॉग तयार केला होता. पण काही कारणामुळे निधीला टायपिंगमध्ये अडचण होती. त्यामुळे तिने व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. तिच्या पहिल्या व्हिडिओला काही दिवसात 10 हजार व्ह्यूज मिळाले. पण तिला YouTube मधून पहिली कमाई करण्यासाटी 8 महिने लागले. निधी चौधरी सांगते की, ती याबाबत गुगलवरून बरंच काही शिकली आहे.
‘मी हॉट आहे म्हणून बॉयफ्रेंड भेटत नाही’, असं म्हणताच व्हायरल झाली ही तरुणी
निधी चौधरीने सांगितले की, तिने राज्यशास्त्रात बीए ऑनर्स केले आहे. तिला शिक्षिका किंवा प्राध्यापक व्हायचे होते, पण घरच्यांच्या सांगण्यावरून तिने 3 वर्ष एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने दिल्ली कोर्टात सराव करताना अशा अनेक गोष्टी पाहिल्या ज्या तिच्यासाठी अत्यंत संवेदनशील होत्या. अशावेळी दुसरीकडे तिची YouTube वर कमाई देखील सुरू झाली होती आणि त्यामुळेच तिने वकिली सोडून फुल टाइम कंटेंट क्रिएटर बनण्याचा निर्णय घेतला.
मुंबई लोकलमध्ये तरूणाचा स्कर्टमध्ये कॅटवॉक, VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT