सचिन वाझेंनी कसा रचला अँटिलीयाचा कट? जाणून घ्या Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२५ फेब्रुवारीपासून हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आहे की अखेर अँटिलियाच्या बाहेर जिलेटनने भरलेली गाडी कशाला ठेवण्यात आली असेल? जर कोणलाही स्फोट करायचाच नव्हता तर जिलटेनने भरलेली गाडी अँटिलयाबाहेर लावण्यामागे नेमका काय हेतू होता? अँटिलिया केसचा तपास करणाऱ्या NIA च्या तपास पथकाकडून एक महत्वाची माहिती हाती लागली आहे. अँटिलिया बाहेर गाडी लावण्याचा कट सचिन वाझेंनी फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला होता. सचिन वाझेंना यातून हे साध्य करायचं होतं की ते अजूनही एक शूर पोलीस अधिकारी आहेत आणि अश्या केसेसची चौकशी ते उत्तमरित्या करू शकतात. NIA च्या तपास पथकाने सचिन वाझेंशी आत्तापर्यंत केलेल्या चौकशीतून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या कटात सचिन वाझेंसोबत त्यांच्या जवळच्या अजूनही काही पोलिस अधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

ADVERTISEMENT

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत ! NIA ची कोर्टात माहिती

आत्तापर्यंतच्या तपासात या कटात मुंबई पोलीस दलातील कोणतेही वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारण्यांची नावं समोर आली नाहीयेत. NIA च्या सूत्रांनुसार या कटातील सर्व मुद्दे आता स्पष्ट होऊ लागले आहेत. अँटिलीया केसमध्ये कोणतंही दहशतवादी कृत्य करण्याचा डाव नव्हता. अँटिलियाचा पूर्ण कट अश्याप्रकारे रचण्यात आला होता त्याची ही कहाणी….२५ फेब्रुवारीच्या रात्री सचिन वाझे स्वत: स्कॉर्पियो गाडी चालवत होते. स्कॉर्पियोच्या बरोबर मागे एक इनोव्हा गाडीही होती. ही इनोव्हा गा़डी मुंबई पोलिसांचीच होती. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पियो गाडी पार्क केल्यानंतर सचिन वाझे स्कॉर्पियोमधून उतरून इनोव्हा गाडीत जाऊन बसले. त्यानंतर सचिन वाजे तिकडून निघून गेले. NIA च्या सूत्रांनुसार पीपीई सूटमध्ये जो माणूस दिसतो आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून सचिन वाझेच आहे. हा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी सचिन वाझेंनी दोन मोठे कुडते विकत घेतले. ज्या ठिकाणी हे कुडते विकत घेण्यात आले त्याठिकाणीही एनआईच्या टीमने तपास केला आहे. यातला एक कुडता जो सचिन वाझेंनी २५ फेब्रुवारीच्या रात्री घातला होता. तो कुडता त्याच रात्री मुलुंड टोलनाक्याजवळ केरोसिन टाकून जाळण्यात आला. तसंच दुसरा कुडता NIA च्या टीमने सचिन वाझेंच्या ठाण्यातील घरातून ताब्यात घेतला. हा तोच कुडता आहे जो सीसीटीव्ही फूटेजमध्ये असलेल्या माणसाच्या अंगावर आहे.

हे वाचलं का?

सचिन वाझे ज्या स्कॉर्पियोमधून उतरून इनोव्हा गाडीत बसले त्या इनोव्हा गाडीच्या ड्रायव्हरचीही NIA ने चौकशी केली. हा ड्रायव्हर सध्या NIA च्या ताब्यात आहे. हा ड्रायव्हर ही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. ही इनोव्हा गाडीही मुंबई पोलीस दलाच्या ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटच्या नागपाडा रिपेअर डेपोत उभी होती. NIA च्या सूत्रांनूसार क्राईम ब्रांचच्या कार्यालयात पार्क केलेल्या काळ्या मर्सिडीजमध्ये ज्या पेट्रोल आणि डिझेलच्या बाटल्या मिळाल्या, त्या खरंतर कुडत्याबरोबर बाकी पुराव्यांना जाळण्यासाठी होत्या.

NIA च्या तपासानुसार स्कॉर्पियो गाडीवरून सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात आधीच बोलणी झाली होती. सचिन वाझेंनीच मनसुखला ही घटना घडण्याच्या एक आठवडा आधीच स्कॉर्पियो गाडी त्यांच्याकडे सोडण्यास सांगितले होते. १७ फेब्रुवारीला सचिन वाझेंनी स्कॉर्पियो गाडी मनसुखकडून ताब्यात घेतली आणि मनसुखला १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये स्कॉर्पियो गाडीची चोरी झाल्याची तक्रार करायला सांगितलं. मनसूखने ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जिथे स्कॉर्पियो गाडी खराब झाली आणि नंतर चोरी झाली याचं ठिकाण तक्रारीत सांगितलं होतं ते ठिकाण खरं नव्हतं. ही गाडी मुळातच दुसऱ्या ठिकाणी सचिन वाझेंना सुपुर्द करण्यात आली होती. सचिन वाझे हे क्राईम ब्रांचच्या सीआईयू विभागात कार्यरत होते. त्य़ामुळे त्यांना ह्याची पक्की माहिती होती की अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यास ही हायप्रोफाईल केस चौकशीसाठी त्यांच्याकडेच येईल. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांना हा विश्वास होता. त्यामुळेच २५ फेब्रुवारीला जेव्हा अँटिलियाच्या बाहेर संशयास्पद कारची बातमी पसरली तेव्हा एटीएसची टीम घटनास्थळावर त्वरीत पोहचली होती. एटीएसचे एक डीसीपीही घटनास्थळावर आले होते, आणि सचिन वाजेही तिकडेच होते. त्यांनी त्या डीसीपीला विचारले की तुमची टीम इकडे काय करतेय? हे प्रकरण आमची टीम सांभाळून घेईल.

ADVERTISEMENT

सचिन वाझे यावेळी सिव्हील ड्रेसमध्ये होते आणि एटीएसचे ते डीसीपी नुकतेच मुंबईत पोस्टिंग होऊन रूजू झाले होते. त्यामुळे सचिन वाझेंना ते ओळखत नव्हते. त्यामुळे डीसीपींनी वाझेंना तुम्ही कोण? इकडे काय करताय असा प्रश्न विचारला तेव्हा मी सचिन वाझे आहे असं उत्तर त्यांनी दिलं. सकाळ होईपर्यंत खरंच या केसची चौकशी सचिन वाझेंकडे आली. आत्तापर्यंत रचलेला कट योग्यरित्या सुरू होता. सचिन वाझेंना विश्वास होता की या केसची योग्य चौकशी करून त्यांना तब्बल १६ वर्षांनंतर मुंबई पोलीस दलात लाईम लाईटमध्ये येण्याची नामी संधी होती. पण या सगळ्यात सचिन वाझेंकडून काही चुका झाल्या आणि या चुकांमुळे ही केस NIA च्या हातात गेली. सचिन वाझेंना ही केस त्यांच्या हातून जाईल असं वाटलंही नव्हतं. NIA च्या हातात केस गेल्यानंतर सचिन वाझे तात्काळ पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागले आणि यातच त्यांच्या हातून एकापाठोपाठ एक चुका होत गेल्या. या प्रकरणात सचिन वाझेंची सर्वात मोठी चूक ही होती की या कटात त्यांनी जी कार वापरली ती आपल्याच ओळखीच्या माणसाकडून घेतली तो ओळखीचा माणूस म्हणजे मनसुख हिरेन. वाझेंना हा अंदाज आला नाही की पुढे जाऊन त्यांची आणि मनसुखची ओळख जगासमोर येईल. १७ ते २५ फेब्रुवारीपर्यंत स्कॉर्पियो गाडी त्यांनी ठाण्यातील आपल्या घराखालीच लावली ही त्यांची दुसरी चूक झाली. सचिन वाझेंना स्वप्नातही वाटलं नव्हतं की अँटिलियाची चौकशी त्यांच्या घरापर्यंत पोहचेल. त्यांची तिसरी चूक ही होती की त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फूटेज आणि डीवीआर तपासाच्या नावावर आपल्याच टीमकडून त्यांनी ताब्यात घेतलं. या कटात त्यांनी क्राईम ब्रांचचीच इनोव्हा गाडी वापरली ही त्यांची चौथी चूक झाली.

ADVERTISEMENT

१०० नंबरवर कॉल आल्यावर घटनास्थळी सर्वात आधी तेच पोहचले ही त्यांची पाचवी चूक झाली. खरंतर त्यांनाच घटनास्थळी आधी पोहाचयचं होतं कारण त्यांनीच ती स्कॉर्पियो गाडी तिथे पार्क केली होती. काळी मर्सिडीज कार त्यांनी सगळ्या पुराव्यांसहित आपल्याच ऑफिसबाहेर पार्क केली ही त्यांची सहावी चूक झाली. जसा त्यांना त्यांच्या घरी NIAची टीम कधीच पोहचणार नाही असा विश्वास होता तसा त्यांना आपल्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसला NIA ची टीम पोहचेल असाही अंदाज नव्हता. त्यांची सातवी चूक ही होती की त्यांनी आपल्या क्राईम ब्रांचमधील सीआईयू युनिटच्या सहकाऱ्यांना त्यांनी या कटात सहभागी करून घेतलं. या केसच्या तपासादरम्यान त्यांनी आपल्या क्राईम ब्रांचमधील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही ही त्यांची आठवी चूक झाली. सत्य समोर आल्यावर त्यांनी मनसुख हिरेनला आोळखतच नाही असं सांगितलं ही त्यांची नववी चूक झाली आणि दहावी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे वेष बदलून स्वतच अँटिलियाबाहेर सचिन वाझे स्कॉर्पियो गाडी पार्क करायला गेले. या संपूर्ण कटाची कहाणी आता NIA च्या हातात आहे. फक्त आता सचिन वाझेंना या कटात ज्यांनी साथ दिली त्यांना शोधणं बाकी आहे. यासंदर्भात सध्या क्राइम ब्रांचचे ५ पोलिस अधिकारी NIA च्या रडारवर आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT