Narayan Rane आणि शिवसेनेमधील संबंध कसे बिघडले?; का आहेत कट्टर शत्रू?
मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद चांगलचा वाढला. राणे यांच्याविरोधात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राणे यांना अटकही करण्यात आलं होतं. पण रात्री उशिरा कोर्टाकडून त्यांना जामीनही मंजूर झाला. नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजप आणि शिवसेना हे […]
ADVERTISEMENT
मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद चांगलचा वाढला. राणे यांच्याविरोधात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राणे यांना अटकही करण्यात आलं होतं. पण रात्री उशिरा कोर्टाकडून त्यांना जामीनही मंजूर झाला.
ADVERTISEMENT
नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजप आणि शिवसेना हे पुन्हा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, दोन्ही पक्ष अशाप्रकारे समोरासमोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणापासून अनेक मुद्यांवरुन भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या समोर ठाकले आहेत.
दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाशिवाय नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक वेळा पाहायला मिळतो. राणे हे त्यांच्या शिवसेना विरोधी भूमिकेसाठी प्रदीर्घ काळापासून ओळखले जातात. मात्र, जेव्हापासून नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे तेव्हापासून नारायण राणे आणि शिवसेना हा संघर्ष अधिकच वाढला आहे.
हे वाचलं का?
राणे विरुद्ध शिवसेना वाद कसा वाढत गेला?
नारायण राणे हे मूळचे शिवसैनिक. शिवसेना पक्षापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. याच पक्षातून राणेंना सत्तेची अनेक मोठ-मोठी पद मिळवली होती. एवढंच नव्हे तर शिवसेनेतूनच नारायण राणे यांना मुख्यमंत्री पद मिळालं होतं. पण असताना 1999 साली शिवसेनेला राज्यात आपली सत्ता गमवावी लागली. दुसरीकडे शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच नारायण राणे हे अस्वस्थच होते.
ADVERTISEMENT
याच अस्वस्थेतेतून शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे या वादाला सुरवात झाली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंवर यथेच्छ टीका करण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडून नारायण राणे हे देखील शिवसेनेवर टीकेची झोड उठवत असे.
ADVERTISEMENT
दरम्यान, बाळासाहेबांच्या पश्चात राणे आणि उद्धव ठाकरे हा संघर्ष सुरु झाला. यात दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची राळ उठवत असल्याचं आजपर्यंत महाराष्ट्राला पाहायला मिळालं. त्यामुळे राणे ही शिवसेनेपासून अधिकाधिक दूर गेले.
त्यानंतर 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा शिवसेनेच्या विनायक राऊतांनी पराभव करुन राणे कुटुंबीयांना पहिला धक्का दिली होता. तर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणेंना देखील पराभवाचा झटका बसला होता.
त्यानंतर २०१७ साली झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने राणेंना पुन्हा एकदा धूळ चारली. हा विजय शिवसेनेसाठी खूपच मोठा होता. कारण यामुळे नारायण राणे हे अक्षरशः बॅकफूटवर गेले होते.
Balasaheb Thackeray Viral Video: राणेंना अटक केल्यानंतर बाळासाहेबांचं ‘ते’ भाषण का होतंय व्हायरल?
असं असताना 2019 साली नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच या साली झालेल्या निवडणुकीत भाजपला सत्ताही गमवावी लागली होती. तर दुसरीकडे स्वत: उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. तेव्हापासून राणे विरुद्ध शिवसेना हा वाद सातत्याने दिसून येत होता.
त्यानंतर आता दोनच दिवसांपासून नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आक्षेपार्ह टीका ही या दोन्ही नेत्यांमधील वादाचा कळस ठरला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT