जगाचा विनाश जवळ आलाय? किलर रोबोट्स ते ब्लॅक होल… 10 गोष्टी घेणार पृथ्वीचा घास
कोरोनाचा धोका टळला असला तरी जगावर असे अनेक धोके आहेत. या धोक्यांमुळे जगाचा अंत होणार असल्याचे भाकीते वर्तवण्यात आली आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्ती आणि महामारी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

How would will end apocalypse : जगाचा अंत होणार आहे, याबाबत आतापर्यंत अनेक भाकीते वर्तवण्यात आली आहेत. या भाकीतांवर अनेक सिनेमे देखील बनवण्य़ात आली. हे सिनेमे पाहून मनुष्याने जगाचा अंत देखील पाहिला. तसेच गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी देखील आली होती. या महामारीतून मनुष्य सावरला आणि तरीही जग सुरळीत चाललंच आहे. मात्र कोरोनाचा धोका टळला असला तरी जगावर असे अनेक धोके आहेत. या धोक्यांमुळे जगाचा अंत होणार असल्याचे भाकीते वर्तवण्यात आली आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्ती आणि महामारी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात. (how would will end apocalypse earth destroy killer robots aliens attack 10 reason behind)
जगाच्या अंत करणाऱ्या भाकितांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यापुर्वी डुम्सडे क्लॉक बाबत जाणून घेऊयात. हे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. जे मानवी क्रियाकलापाद्वारे नैसर्गिक आपत्तीची माहिती देते. या घड्याळाला रात्री 12 वाजता धोक्याची घंटा म्हणून पाहिले जाते. 1945 ला जपानवर परमाणू हल्ला झाल्यानंतर जगाला मानवनिर्मित धोक्यापासून सावध करण्यासाठी या घड्याळाची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये रात्री 12 ची वेळ दाखवली की जगाचा अंत अगदी जवळ आल्याचे बोलले जात आहे. आता जाणून घेऊयात 10 कारणे ज्यामुळे जगाचा अंत होणार आहे.
महाकाय उल्का
डायनोसोरच्या अंताचा कारण ठरलेला उल्का जगाचा अंत करू शकतो. Chicxulub उल्का समुद्रात येऊन पडला होता. त्यानंतर त्या जागेला मेक्सिको खाडी असे नाव पडले. हा उल्का पडल्याने मोठी त्सुनामी आली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर आकाशात धुळींचे ढग तयार झाले होते, आणि हवामान बदलाचा वेग वाढला होता. हा उल्का पडल्यामुळे धऱतीवरील 75 टक्के प्राणी आणि झाडांच्या प्रजाती नष्ट झाल्या होत्या. महाकाय उल्का 100 दशलक्ष वर्षात एकदाच ग्रहाला टक्कर देतो, आता अशा घटनेची पुनरावृत्ती 30 दशलक्ष वर्षात होण्याची शक्यता आहे, असे खगोल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
किलर रोबोट्स
यंदाच्या वर्षात आर्टीफिशियल इंटेलिजेंस (AI)चा विकास झाला. या सिस्टमचा मनुष्याला धोका आहे की फायदा आहे, यावर नेहमीच वाद झाला आहे. तज्ज्ञांनी याला मोठा धोका देखील मानले आहे. हे प्रकरण त्यावेळेस जास्त गंभीर झाले, ज्यावेळी 1000 हून अधिक टेक टायकून्सनी एका लेटरवर सह्या करून AI ला बनवणाऱ्या धोकादायक शर्यतीला संपवण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. मनुष्याचे तंत्रज्ञानावरील नियंत्रण सुटण्याआधी आणि रोबोटमुळे मानव नष्ट होण्यापुर्वी तातडीचे पाऊल उचलण्याची गरज आहे.