Malad Building Collapse : मुंबईत सध्याच्या घडीला ४०७ इमारती धोकादायक अवस्थेत
मालाड येथील इमारत दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागल्यानंतर मुंबई महापालिकेसमोर आणखी एक आव्हान तयार झालेलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ४०७ इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या ४०७ इमारतींपैकी ३२२ इमारती या खासगी मालकीच्या असून राहण्यासाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल […]
ADVERTISEMENT
मालाड येथील इमारत दुर्घटनेत १२ जणांना आपले जीव गमवावे लागल्यानंतर मुंबई महापालिकेसमोर आणखी एक आव्हान तयार झालेलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ४०७ इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या ४०७ इमारतींपैकी ३२२ इमारती या खासगी मालकीच्या असून राहण्यासाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय
या सर्व इमारती राहण्यासाठी योग्य नसल्यामुळे पाडणं गरजेचं आहे. परंतू यासाठी या इमारतीत राहणाऱ्या लोकांना समजावून बाहेर काढणं हे मुंबई पालिकेसमोर मोठं आव्हान आहे. ३२२ खासगी इमारतीव्यतिरीक्त ५९ इमारती या मुंबई महापालिकेच्या तर २६ इमारती या राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आहेत. मालाड येथे कोसळलेली इमारत हे अवैध बांधकामातली होती. सध्या मुंबईत मान्सूनने धडाकेबाज एंट्री घेतली असून पावसात या धोकादायक इमारती पडून मनुष्यहानी होण्याची भीती असते. त्यामुळे या इमारतीमधील लोकांना बाहेर काढून त्यांचं पुनर्वसन करणं हे महापालिकेसमोरचं मोठं आव्हान असणार आहे.
हे वाचलं का?
Monsoon in Mumbai : रविवार-सोमवार शहरात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज
सध्याच्या घडीला मुंबईत सर्वाधिक धोकादायक इमारती या H-West वॉर्डात (वांद्रे, खार पश्चिम) या भागात आहेत. या भागात सध्या ४९ धोकादायक इमारती असून N Ward (भांडूप) परिसरात ४७ धोकादायक इमारती आहेत. H-East Ward (वांद्रे पूर्व, कलिना) या भागात सर्वात कमी म्हणजे १८ धोकादायक इमारती असून P-North Ward (मालाड) भागात २५ इमारती धोकादायक आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या नियमानुसार, ३० वर्षांपेक्षा जास्त काळ राहत असलेल्या इमारतींमधील नागरिकांनी स्ट्रक्चरल ऑडीट करणं बंधनकारक असतं. परंतू अनेकदा महापालिका प्रशासनाने इमारत रिकामी करण्याची नोटीस पाठवली की रहिवासी कोर्टात जातात. मग अशावेळी महापालिका प्रशासन या नागरिकांकडून स्वतःच्या जबाबदारीवर या इमारतींमध्ये राहत असल्याचं लिहून घेते अशी माहिती महापालिका अधिकाऱ्याने दिली.
ADVERTISEMENT
Monsoon in Mumbai : ११ दिवसांत शहरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, मुंबईसह कोकण किनारपट्टीला IMD चा अलर्ट
आतापर्यंत मुंबई महापालिकेने १५० धोकादायक इमारती पाडल्या असून ७३ इमारतींमधील नागरिकांनी कोर्टात धाव घेतल्यामुळे या इमारती पाडायचं काम बाकी राहिलं आहे. काही इमारतींमध्ये महापालिकेने वीज आणि पाण्याचं कनेक्शन कापूनही नागरिक इमारतीत राहत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बाहेर काढणं ही पालिकेसाठी जिकरीचं काम होऊन बसतं. त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासन यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT