पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचा कट फसला, पतीला अटक, पुण्यातली धक्कादायक घटना
पंकज खेळकर/समीर शेख प्रतिनिधी पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी पत्नीचा खून करून तिच्या आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक केली आहे. या माणसाने त्याच्या पत्नीचा खून केला, त्यानंतर बनाव रचला आणि असं भासवण्याचा प्रयत्न केला की ती हत्या नसून आत्महत्या आहे. पोलिसांना सुरूवातीपासूनच त्याच्यावर संशय होता. अखेर हे प्रकरण आत्महत्येचं नाही तर हत्येचं आहे हे समोर […]
ADVERTISEMENT
पंकज खेळकर/समीर शेख प्रतिनिधी
ADVERTISEMENT
पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी पत्नीचा खून करून तिच्या आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीला अटक केली आहे. या माणसाने त्याच्या पत्नीचा खून केला, त्यानंतर बनाव रचला आणि असं भासवण्याचा प्रयत्न केला की ती हत्या नसून आत्महत्या आहे. पोलिसांना सुरूवातीपासूनच त्याच्यावर संशय होता. अखेर हे प्रकरण आत्महत्येचं नाही तर हत्येचं आहे हे समोर आलंच.
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलाची आईनेच केली हत्या, सांगलीतली धक्कादायक घटना
हे वाचलं का?
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हेमंत अशोक मोहिते हा 29 वर्षीय तरूण सातारा जिल्ह्यातील कराडचा राहणारा आहे. त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसय आहे. हेमंतची आणि त्याच्या पत्नीची म्हणजेच सपना अशोक गवारेची ओळक एका मॅट्रीमोनियल वेबसाईटवर झाली होती. सपनाला हेमंतने हे सांगितलं होतं की तो इंजिनिअरींग आणि UPSC ची तयारी करतो आहे. त्यानंतर या दोघांमध्ये ओळख वाढली. तसंच या दोघांचे प्रेमसंबंधही जुळून आले.
धक्कादायक ! चुगली करुन बदनामी करतो म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून
ADVERTISEMENT
हेमंत आणि सपना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हेमंत आणि सपना या दोघांच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. दोन्हीकडून विरोध होऊनही 28 ऑक्टोबर 2021 ला या दोघांनी आळंदी या ठिकाणी जाऊन लग्न केलं. सपनाने हेमंत सोबत लग्न केलं ही बाब जेव्हा तिच्या कुटुंबीयांना कळली तेव्हा त्यांनी हेमंतला घटस्फोट दे आणि हे नातं संपव असं तिला सांगितलं होतं. ही गोष्ट सपनाने हेमंतला सांगितली. त्यानंतर हे दोघं म्हणजेच हेमंत आणि सपना पिंपरी-चिंचवडला राहण्यास आले.
ADVERTISEMENT
धक्कादायक ! दारु प्यायला २० रुपये न दिल्यामुळे बारामतीत भाजीविक्रेत्याचा खून
हेमंत सपना पिंपरीत राहू लागले. मात्र हेमंतला कायम ही भीती वाटत होती की सपनाचे कुटुंबीय तिला त्याच्यापासून दूर करतील. त्यामुळे तो पिंपरीतल्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सपनासोबत राहात होता. एक दिवस हेमंतला हे समजलं की सपनाला तिच्या कुटुंबीयांचं ऐकायचं आहे आणि ती आपल्याशी नातं तोडणार आहे. यामुळे तो खूप चिडला. रागाच्या भरात तो हॉटेलवर आला आणि एका स्कार्फने त्याने सपनाचा गळा आवळला आणि तिला हॉटेलच्या पंख्याला लटकवलं. तसंच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसमोर आणि मालकासमोर असा बनाव रचला की तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Pune Crime: पुण्यात बस स्टॉपवर झोपलेल्या मुंबईतील व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या
हॉटेल कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यावेळी त्यांना हेमंतवर संशय आला. तो काहीतरी लपवतो आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली. सुरूवातीला त्याने पोलिसांना हेच पटवून दिलं की सपनाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आणखी कसून चौकशी केल्यानंतर हेमंतने त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्यानेच सपनाला म्हणजेच त्याच्या पत्नीला ठार केलं आणि आत्महत्येचा बनाव रचला अशी कबुली दिली.
या प्रकरणी पोलिसांनी लगेचच हेमंतला अटक केली. एवढंच नाही तर वाकड पोलीस ठाण्यात सपनाच्या वडिलांनीही हेमंतच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यानंतर हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी हेमंतला अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT