डायबेटिसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून गृहमंत्रीपद नाकारलं-जयंत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ब्लड प्रेशर वाढतं, डायबिटिसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद स्वीकारलं नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्सा सांगितला. 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर गृहमंत्रीपद तुम्हाला सांभाळायचं आहे, असं मला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. त्यावेळी एका लग्नात गृहखातं कसं असतं हे मी आर. आर. पाटील यांना विचारलं. त्यावेळी आबांनी विचारलं, जयंतराव तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? डायबेटिस आहे का? याची विचारणा केली. मी नाही म्हटल्यावर मला आबा म्हणाले की तुम्ही गृहमंत्री व्हा तुम्हाला हे दोन्ही त्रास सुरू होतील. मला त्या काळात ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. माझ्या खासगी सचिवालाही हा त्रास सुरू झाला. गृहमंत्री झालो तेव्हा ब्लड प्रेशर मागे लागलं आता डायबेटिस लावून घ्यायचा नाही असं माझं मत तयार झालं होतं. त्यामुळे नंतर मी हे पद नाकारलं असंही जयंत पाटील म्हणाले.

सांगली जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पोलीस स्टेशन हे लोकांच्या मदतीला असतात, त्यामुळे या वास्तूची भीती वाटायला नको. लोकांना न्याय मिळण्याचा विश्वास वाटेल, असं वातावरण आपल्याला तयार करायला हवं. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलीस दल काम करत आहे. मोठ्या धाडसाने चोरी झालेला मुद्देमाल आमच्या पोलीस बांधवांनी परत मिळवून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे, असे म्हणत जयंत पाटील सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.

हे वाचलं का?

कांदे-भुजबळ वादाचा परिणाम काहीही होवो पालकमंत्री भुजबळच असणार-जयंत पाटील

आणखी काय म्हणाले जयंत पाटील?

ADVERTISEMENT

आज कुठे काही गोंधळ झाला आणि पोलिसांनी हवेत जरी गोळीबार केला तर पोलिसांची चौकशी होते. गोंधळ घालणारे लांबच रहातात, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्याची आम्ही चौकशी करतो. त्यामुळे आपण पोलिसांना जेवढे अधिक संरक्षण देऊ, तेवढंच अधिक धाडसानं पोलीस रस्त्यावर उतरतील. अनेकवेळा राज्यकर्त्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांबद्दल गैरसमज होतात. त्यावेळी राज्यकर्ते तातडीनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांला बदला अशी भूमिका घेतात. गैरसमज झाला असेल पण लगेच त्या अधिकाऱ्यांची बदली करणं हा काय त्यावर उपाय नसतो. खरंच जर त्या अधिकाऱ्यांकडून चूक झाली असेल तर त्या अधिकाऱ्याला चूक सुधारण्याची संधी ही राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT