सुशील खोडवेकरांची परभणीतील कारकीर्दही राहिली वादग्रस्त; विधानसभेत गाजलं होतं प्रकरण
शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने कृषी विभागात उपसचिवपदी कार्यरत असलेल्या सुशील खोडवेकरांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव येण्याची सुशील खोडवेकर यांची ही पहिलीच वेळ नाही. परभणीत कार्यरत असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सुशील […]
ADVERTISEMENT
शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने कृषी विभागात उपसचिवपदी कार्यरत असलेल्या सुशील खोडवेकरांना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव येण्याची सुशील खोडवेकर यांची ही पहिलीच वेळ नाही. परभणीत कार्यरत असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता.
ADVERTISEMENT
उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सुशील खोडवेकरांच्या अटकेमुळे टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत.
टीईटी घोटाळा : 7,800 नापास उमेदवारांना पैसे घेऊन केलं पास; समोर आली धक्कादायक माहिती
हे वाचलं का?
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव येण्याची आयएएस अधिकारी सुशील खोडवे यांची ही पहिलीच वेळ नाही. कृषी विभागात रूजू होण्यापूर्वी सुशील खोडवेकर परभणी जिल्हा परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी कंत्राटात भ्रष्टाचार केल्याचा आरोप खोडवेकर यांच्यावर झाला होता.
खोडवेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी स्वच्छ भारत अभियानात एका कंत्राटात खोडवेकर यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला होता. हा मुद्दा बराच गाजला होता. विधिमंडळ अधिवेशनातही या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्याचबरोबर त्यांच्या वर्तणुकीचे किस्सेही गाजले होते.
ADVERTISEMENT
TET Exam scam : पात्र उमेदवारांच्या यादीत घुसवली 500 नावे; असा करण्यात आला घोटाळा…
ADVERTISEMENT
सुशील खोडवेकर यांना टीईटी परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी पुण्याच्या सायबर पोलिसांनी शनिवारी (२९ जानेवारी) ठाण्यातून अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांनी ही दिली. खोडवेकर यांना पुणे येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना ३१ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यात रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. विशेषतः मोठे अधिकारीही या घोटाळ्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे अपात्र ठरलेल्या हजारो परीक्षार्थींना पुन्हा पात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, याची आता चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकांविरुद्ध शिक्षण विभागाकडून काय कारवाई होणार? याकडे शैक्षणिक वर्तूळाचं लक्ष लागलं आहे.
२०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र, पुणेच्या सायबर विभागाने केलेल्या तपासणीत प्रत्यक्ष निकाल पडताळल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याची बाब समोर आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT