उद्धवजींनी विचार केला तर आमचे नेतेही विचार करतील, सरनाईकांच्या पत्रावर भाजपची प्रतिक्रिया
प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहील्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपशी पुन्हा हातमिळवणी करावी असा सल्ला सरनाईकांनी आपल्या पत्रात उद्धव ठाकरेंना दिला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सूचक प्रतिक्रीया दिली आहे. सरनाईकांच्या आरोपांवर NCP ची सावध प्रतिक्रीया, जयंत पाटील म्हणतात… “युतीसारख्या कोणत्याही विषयावर […]
ADVERTISEMENT
प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहील्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपशी पुन्हा हातमिळवणी करावी असा सल्ला सरनाईकांनी आपल्या पत्रात उद्धव ठाकरेंना दिला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सूचक प्रतिक्रीया दिली आहे.
ADVERTISEMENT
सरनाईकांच्या आरोपांवर NCP ची सावध प्रतिक्रीया, जयंत पाटील म्हणतात…
“युतीसारख्या कोणत्याही विषयावर आम्ही काही बोललो की लगेच सामना मध्ये अग्रलेख येतो की सरकार नसल्यामुळे यांच्या पोटात दुखतंय. त्यामुळे या विषयावर आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. परंतू उद्धवजींनी विचार केला तर आमचे नेते वर बसलेत ते विचार विचार करतील. गेले १८ महिने आम्ही हीच गोष्ट घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो. बाळासाहेबांनी ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
”लहान तोंडी मोठा घास” घेत सरनाईकांचा लेटरबॉम्ब, वाचा ५ महत्वाचे मुद्दे
बाळासाहेबांनी अल्पसंख्यांकांचं राजकारण केलं नाही. मान खाली गेली नाही पाहिजे असं शिवसेनेचं राजकारण होतं. पण आता तिच लोकं टिपू सुलतानाच्या जयंती साजऱ्या करायला लागली आहेत असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सेनेला टोला लगावला.
ADVERTISEMENT
दरम्यान प्रताप सरनाईकांच्या पत्राचा मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख या नात्याने विचार करावा असा सल्ला भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
प्रताप सरनाईक यांच्या पत्राकडे उद्धवजिंनी मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पहावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे,
त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा…!!@BJP4Maharashtra pic.twitter.com/majoP3dQod— Prasad Lad (@PrasadLadInd) June 20, 2021
तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांच्या पत्रानंतर सूचक ट्विट करत चर्चेसाठी नवीन विषय दिला आहे.
महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे..
हीच ती वेळ !!!
???
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2021
त्यामुळे सरनाईकांच्या या लेटरबाँबवर राज्यातील राजकारणात आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय प्रतिक्रीया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT