गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकच्या रामकुंडात विसर्जन
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज नाशिकच्या रामकुंड या ठिकाणी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. साडेदहाच्या सुमारास विधीवत पूजा करून अस्थी विसर्जन करण्यात आलं. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. […]
ADVERTISEMENT
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज नाशिकच्या रामकुंड या ठिकाणी त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. साडेदहाच्या सुमारास विधीवत पूजा करून अस्थी विसर्जन करण्यात आलं. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हे वाचलं का?
यावेळी सर्व कार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठेही गर्दी होणार नाही याची दखल पोलीस घेत आहेत. रामकुंडावर अस्थींचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. सर्व कार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठेही गर्दी होणार नाही याची दखल पोलीस घेत आहेत. रामकुंडावर अस्थींचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या चितेला त्यांचा सख्खा लहान भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी अग्नी दिला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी लतादीदींच पार्थिव शिवाजी पार्क मैदान या ठिकाणी आणण्यात आलं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुपरस्टार शाहरुख खान, सुपरस्टार आमिर खान, माजी क्रिेकेटर सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात निधन झालं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर लता मंगेशकर या आता आपल्यात नाहीत अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्या देशाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT