महाराज म्हणतात, मी आत्महत्या करणार; बीडमध्ये Viral Video मुळे खळबळ
बीडच्या गेवराई तालुक्यातील एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जो कोळगाव येथील सूर्यमंदीर संस्थानच्या महाराजांचा व्हिडिओ असून त्यात आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यमंदीर संस्थानच्या हनुमान महाराजांवर तीन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये […]
ADVERTISEMENT

बीडच्या गेवराई तालुक्यातील एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जो कोळगाव येथील सूर्यमंदीर संस्थानच्या महाराजांचा व्हिडिओ असून त्यात आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यमंदीर संस्थानच्या हनुमान महाराजांवर तीन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विनयभंगाचा आरोप झालेल्या महाराजांनी व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय?
‘मी रस्त्याने जात असताना बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या आपल्या घरी मला चहासाठी बोलवलं. मी गेलो तेव्हा मला त्यांचा घराच्या दरवाजा तुटलेला दिसला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, तुम्ही हा दरवाजा दुरुस्त करुन घ्या. त्यावेळी त्यांनी अचानक माझ्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे माझे काही कार्यक्रम झाले नाही त्यामुळे माझ्याकडे फार काही पैसे नाही. तरीही जर काही ५-१० हजारांची मदत करता आली तर मी तुम्हाला करेन. या अगोदर देखील त्यांनी माझ्याकडून १०-१० हजार उसने घेतले होते आणि ते त्यांनी मला परत देखील केले होते. त्यामुळे यावेळेस जर काही शक्य झालं तर मी मदत करेन असं त्यांना म्हटलं होतं. दरम्यान, त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या दिवशी घरी जेवणाला यावं अशी विनंती केली होती.’