महाराष्ट्रात दिवसभरात 3500 हून अधिक Corona रूग्णांचं निदान, 45 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात आज दिवसभरात 3595 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3240 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज दिवसभरात 45 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आज घडीला 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 20 हजार 310 होऊन घरी आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आज दिवसभरात 3595 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3240 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज दिवसभरात 45 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आज घडीला 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 20 हजार 310 होऊन घरी आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 टक्के इतकं झालं आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 65 लाख 29 हजार 882 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 11 हजार 525 नमुने आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 89 हजार 425 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 342 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3595 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 11 हजार 525 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
हे वाचलं का?
मुंबई – 5589
ठाणे- 7226
ADVERTISEMENT
रत्नागिरी-1182
ADVERTISEMENT
पुणे-13507
सातारा- 4256
सांगली-2321
कोल्हापूर-1007
सोलापूर-2420
अहमदनगर-6575
महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्यात सक्रिय रूग्ण सर्वाधिक आहेत. त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत.
Corona Third Wave : तिसरी लाट कधी येणार? किती घातक असेल? BHU च्या वैज्ञानिकाची माहिती
मुंबईत 446 नवे रूग्ण
मुंबईत 446 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 431 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत 7 लाख 13 हजार 605 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. मुंबईत 4654 सक्रिय रूग्ण सध्याच्या घडीला आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट 1279 दिवसांवर गेला आहे.
वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकाने कोरोनाच्या तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट जास्त घातक नसेल, असं प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांनी म्हटलं आहे.
तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते?
प्रा. चौबे यांनी यांच्या अंदाजाप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट कमीत कमी तीन महिन्यानंतर येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखण्यात लसीकरण मोहीम फायदेशीर ठरेल. कारण लस घेतलेल्या नागरिकांना आणि कोरोनातून बऱ्या झालेले लोक म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्रुपमध्ये येणारे लोक सुरक्षित राहतील, असं चौबे यांनी म्हटलं आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT