Nagpur: भयंकर.. महिलेवर कुऱ्हाडीने वार, जखमी अवस्थेत गँगरेप करुन हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur 35 year old Woman Gang Rape and Murder: नागपूर: नागपूरच्या (Nagpur) ग्रामीण भागातील खापा येथे एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी महिलेवर जखमी अवस्थेत सामूहिक बलात्कार (Gangrape) करून तिची हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. (in nagpur an injured woman was gang raped stabbed to head with an ax and killed)

ही घटना सावनेरच्या खापा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरेवाणी गावातील असून शेतात काम करणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने जेव्हा आरोपींना प्रतिकार केला तेव्हा त्यांनी थेट महिलेवर कुऱ्हाडीने वार करुन तिला गंभीर जखमी केलं. एकीकडे महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना दुसरीकडे वासनांध आरोपी त्याच अवस्थेत महिलेवर बलात्कार करत होते. या सगळ्या घृणास्पद प्रकारनंतर महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.

Mumbai Crime: अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा पैकी 3 आरोपीही Minor

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ही सावनेर तहसील अंतर्गत खापा परिसरातील सुरेवाणी गावची रहिवासी होती. तिच्या पतीला वाघाची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पती कारागृहात असल्याने ही महिला शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होती.

पती तुरुंगात असल्याने महिला घरी एकटीच राहत होती. याच गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आरोपी दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांची घेतला. या तीनही वासनांधांची तिच्यावर बऱ्याच दिवसांपासून वाईट नजर होती.

ADVERTISEMENT

घटनेच्या दिवशी आरोपींनी महिलेला शेतात एकटीच काम करताना पाहिले. त्यावेळी त्यांनी मिळून महिलेवर बलात्कार करण्याचा कट रचला. सुरुवातीला तीनही आरोपी महिलेजवळ गेले आणि त्यांनी तिच्याजवळ जाऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी या तिघांनाही महिलेने स्पष्ट नकार दिला.

ADVERTISEMENT

त्यानंतर तिघाही आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलेने त्यांना बराच प्रतिकार केला. त्यामुळे या तीनही आरोपींनी मिळून तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांची वासना कायम होती. त्यामुळे त्यांनी गंभीर जखमी असलेल्या अवस्थेतील त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

Crime : ‘बेस्ट फ्रेंडनेच’ केला विश्वासघात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

यावेळी महिला मदतीची याचनाही केली पण जवळपास कोणीच नसल्याने तिच्या मदतीला कोणालाच जाता आलं नाही. अखेर सामूहिक बलात्कारानंतर गंभीर जखमी झालेल्या महिलेचा शेतातच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. ज्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाला सुरुवात करून तीन आरोपींना अटक करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी तीनही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांनी मुंबई Tak सोबत बोलताना दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT