Nandurbar: पेट्रोलच्या दराला वैतागून ITI शिकलेल्या तरुणाने तयार केली बॅटरीवर चालणारी तीन चाकी कार
रोहिणी ठाकूर, नंदूरबार सद्यस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार्या इंधन दरवाढीने जनसामान्य हैराण झाले आहेत यामुळे दररोज बसणार्या इंधन महागाईच्या चटक्यांमुळे नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील अजेपूर येथील एका 26 वर्षीय युवकाने चक्क भंगारातील साहित्य वापरुन तीन चाकी कार (Three wheeler Car) बनविली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन साकारण्यात आलेली ही कार ताशी सुमारे 45 किमी वेगाने धावते. तेही […]
ADVERTISEMENT
रोहिणी ठाकूर, नंदूरबार
ADVERTISEMENT
सद्यस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार्या इंधन दरवाढीने जनसामान्य हैराण झाले आहेत यामुळे दररोज बसणार्या इंधन महागाईच्या चटक्यांमुळे नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील अजेपूर येथील एका 26 वर्षीय युवकाने चक्क भंगारातील साहित्य वापरुन तीन चाकी कार (Three wheeler Car) बनविली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन साकारण्यात आलेली ही कार ताशी सुमारे 45 किमी वेगाने धावते. तेही १ रूपयात ५० किमी.
नंदूरबार तालुक्यातील अजेपूर (बंधारपाडा) येथील अर्जुन चौरे या युवकाचे शिक्षण नंदुरबार येथील शासकीय आयटीआय (ITI) इलेक्ट्रिकल्समध्ये झाले आहे. सध्या तो नंदूरबार पालिकेच्या झराळी पम्पिंग स्टेशनवर खासगी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. यातून त्याला मिळणारे मानधन तोकडेच आहे.
हे वाचलं का?
अभिमानास्पद! Global Teacher डिसले गुरूजींची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती
घरी आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. अर्जुन चौरे याच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. मात्र यात उदरनिर्वाह चालविणे कठीत जाते. त्यातच आता दिवसेंदिवस वाढणार्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाल्याने याचे चटके अर्जुनला देखील सोसावे लागत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अजेपूरहून नंदुरबारला पाणी पुरवठा करणार्या झराळी प्रकल्पापर्यंत अर्जुन जुन्या दुचाकीने जात होता. मात्र आता इंधन दरवाढ झाल्याने त्याला मिळणार्या मानधनात दुचाकी वापरणे कठीण होते. कारण नंदुरबार जिल्ह्यात सध्या 104 रूपयांवर पेट्रालचे (Petrol) दर पोहचले आहेत.
यामुळे त्याने पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी काहीतरी नवीन करावं असं विचार करताना त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. सध्या बाजारात बॅटरीवर चालणारी स्कूटी विक्रीला आहे. बॅटरीवर चालणार्या कारचे प्रयोग देखील होत आहेत.
असे असले तरी भंगारातून विविध साहित्य गोळा करुन लिथियम बॅटरीचा वापर करीत तयार केलेली तीन चाकी कार हा सध्या कुतूहलाचा विषय बनला आहे. कारण अर्जुन चौरे याने ही तीन चाकी कार तयार केली आहे.
‘असं’ आहे Twitter ला टक्कर देणारं Koo App
झराळी येथील पम्पिंग स्टेशनवर कार्यरत असल्याने त्याला वीजेची उर्जा प्रवाहित होऊन कोठे आणि कसा परिणाम घडविते याचा अभ्यास होता. त्याच ज्ञानाच्या बळावर भंगारातील टाकाऊ चाक, टायर, स्टेअरिंग त्याने मिळविले. त्याचा व्यवस्थित वापर करुन एक चालक व मागे एक जण बसू शकेल अशी आसन व्यवस्था करुन त्याने तीन चाकी कार तयार केली.
या कारमध्ये लिथियम बॅटरीचा वापर करण्यात आला. तसेच सदरची कार तासभर चार्जिंग केल्यावर 50 किलोमीटरपर्यंत ताशी 45 किमी वेगाने धावू शकते. यासाठी युवकाने नंदुरबार येथून भंगार साहित्याची खरेदी करत तीन चाकी कार तयार केली. यासाठी त्याला 40 हजाराचा खर्च आला.
अवघ्या 15 दिवसात त्याने ही तीन चाकी कार तयार केली. लवकरच कमी खर्चात इंधनाचा वापर न करता वीजेवर तसेच सोलरवर चालणारी कार तयार करण्याचा अर्जुन चौरे याचा मानस आहे. ही कार चालताना कुठलाही आवाज येत नाही व ध्वनी प्रदूषणही होत नाही. त्यामुळे आता या आगळ्यावेगळ्या कारची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT