शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडली एकमेकांची डोकी, तुफान हाणामारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

Shinde Group : उल्हासनगर: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे गट (Shinde vs Thackeray Group) असा सामना सातत्याने पाहायला मिळत आहे. अगदी वरच्या फळीपासून शेवटच्या कार्यकर्त्यांमध्ये हे वाद महाराष्ट्रात सातत्याने कुठे ना कुठे पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तर हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र, असं असताना आता शिंदे गटातीलच (Shinde Group) कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा नेमका प्रकार काय जाणून घेऊया सविस्तर. (in ulhasnagar there was a clash between the shinde group video of the scuffle goes viral)

नेमकी घटना काय?

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये आज (12 डिसेंबर) शिंदे गटाच्याच दोन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. एकाच गटातील कार्यकर्त्यांमध्ये दिवसाढवळ्या फ्रिस्टाईल हाणामारी झाली. ज्यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि उल्हासनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील एसएसटी कॉलेज जवळील मणेरा गावातील रस्त्याची दुरवस्था अनेक वर्षापासून आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी 17 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता.

ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा का झाला? पोलिसांचा लाठीचार्ज

ADVERTISEMENT

याच रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे येणार असल्यानं शिंदे गटाचे पदाधिकारी अरुण आशान आणि विजय जोशी हे कार्यकर्त्यांसह तिथे गेले होते. यावेळी या परिसरातील माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलांनी काही साथीदारांसह विजय जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अचानक हल्ला चढवला. यामध्ये जोशी यांच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यात दुखापत झाली. तर स्वतः विजय जोशी यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.

ADVERTISEMENT

या सगळ्या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर विजय जोशी यांनी तक्रार करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या पोलिसांकडून कुणाचीही तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही. यां घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरु केली. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर आपल्याच गटातल्या कार्यकर्त्यांनी आपल्यालाच मारहाण केल्यानं विजय जोशी यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपाल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे ते शिंदे गट : राज यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत समाचार

एकीकडे राज्यात आपलीच शिवसेना खरी हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, असं असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते जर एकमेकांची डोकी फोडत असतील तर मात्र, शिंदेंना आपल्या पक्षाच्या रचनेबाबत नक्कीच गांभीर्याने विचार करावा लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT