कमाल खानच्या अडचणीत वाढ; बोरिवली कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल खान याच्या अडचणी वाढत आहेत. वादग्रस्त ट्विट केआरकेला महागात पडत आहे. केआरकेला मंगळवारी सकाळी मालाड पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. कमाल आर खानला बोरिवली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला आता 14 दिवस तुरुंगात रहावं लागणार आहे. केआरकेने जामिनासाठी अर्ज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल खान याच्या अडचणी वाढत आहेत. वादग्रस्त ट्विट केआरकेला महागात पडत आहे. केआरकेला मंगळवारी सकाळी मालाड पोलिसांनी विमानतळावरून अटक केली. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. कमाल आर खानला बोरिवली कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला आता 14 दिवस तुरुंगात रहावं लागणार आहे.

केआरकेने जामिनासाठी अर्ज केला

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कमाल खान यानेही विलंब न लावता जामीन अर्ज दाखल केला आहे. बोरिवली कोर्टातच दुपारी चार वाजता जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आता केआरकेला जामीन मिळणार की त्याला १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार, हे न्यायालयाच्या सुनावणीनंतरच कळेल.

इरफान खानबाबत वादग्रस्त ट्विट

अभिनेता इरफान खानच्या बाबतीत ट्विट करताना कमाल म्हणाला होता, “देव करो की, वाईट काळ कुणावर येऊ नये. मात्र, सत्य हे आहे की, इरफान खान हा अतिशय वाईट व्यक्ती होता. त्यानं अनेकांवर अन्याय केलं. इरफान हा एक ऍक्टर आहे जो निर्मात्यांना कुत्रा म्हणायचा. चित्रपटांची शूटिंग अर्धवट सोडून द्यायचा. त्यामुळे बिचारे निर्माते रडत राहिले.”

कमाल खाननं अभिनेता ऋषी कपूर यांच्याबाबत देखील बदनामीकारक ट्विट केलं होतं.

ऋषी कपूर हे एच. एन रिलायन्स रुग्णालयात ऍडमिट आहेत. मला त्यांना म्हणायचं आहे. सर, बरं होऊन परत या, तसंच निघून जाऊ नका. कारण दोन-तीन दिवसात दारूची दुकाने उघडणार आहेत.”

राहुल कनाल यांनी केली होती तक्रार

कमाल खान ने सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते इरफान खान ऋषी कपूर यांच्या चारित्र्यविषयी जन माणसात बदनामी करण्याचे हेतूने सोशल मीडियावरील ट्विटर या माध्यमाचा वापर केला. इरफान खान यांच्याविषयी विषयी बदनामीकारक मजकूर वापरून आणि ऋषी कपूर यांच्या विषयी ते व्यासनाधीन असून दारू न मिळाल्याने ते गंभीर आजारी झाले आहेत, अशा आशयाचे घाणेरडे शब्द व भाषा वापरून सार्वजनिक रित्या ट्विट केल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार राहुल कनल यांनी वांद्रे पोलिसात कमाल खानच्या विरोधात 20 मे 2020 रोजी तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp