IND Vs Pak : भारत पाकिस्तान T20 सामन्याला आमचा विरोध-रामदास आठवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत पाकिस्तान T20 सामन्याला आमचा विरोध आहे अशी सडेतोड भूमिका रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हेदेखील याबाबत अमित शाह यांना सांगतील असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. सध्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्यामुळे ही मॅच होऊ नये असं वाटत असल्याचंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आठवले?

काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधात भारतीय सैन्याची सुरू असलेली चकमक अद्यापही थांबलेली नाही. अशातच भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी आम्ही केली आहे. एवढंच नाही तर गरज पडल्यास भारताने पाकिस्तान सोबत युद्ध करावे अशीही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याची रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर सुरू असलेल्या गोळीबारामुळे 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे यामुळे रामदास आठवले यांनी पाकिस्तान वर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच पाकिस्तानवर आणखीन एक सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ आली आहे आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

Ind Vs Pak : भारताचे जवान शहीद होत आहेत, पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना कशासाठी? ओवेसींचा मोदींना सवाल

ADVERTISEMENT

भारताने आता पाकिस्तानचे फार लाड करू नये असाही सल्ला आठवले यांनी केंद्र सरकारला दिला आहे त्यामुळे 24 ऑक्टोबरला टी-20 विश्वचषकात भारत पाकिस्तानचा सामना होऊ नये यासाठी देशी जायचे अध्यक्ष अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे आठवले यांनी म्हटलंय आता आठवलेंच्या या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांबाबत काय म्हणाले आठवले?

ईडीचा वापर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केला जातो आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं त्याबाबत विचारलं असता आठवले म्हणाले की महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची आम्हाला काहीच गरज नाही पाच वर्षांनी आमचंच सरकार येणार आहे असं उत्तर आता आठवलेंनी दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT