समुद्रात बुडणाऱ्या बोटीवरील १६ खलाशांना वाचवण्यात यश, रेवदंडा येथे Cost Guard चं रेस्क्यु ऑपरेशन
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या MV Mangalam या बोटीतील १६ खलाशांना सुखरुप वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटीने हे रेस्क्यु ऑपरेशन पार पाडत १६ खलाशांचे प्राण वाचवले. गुरुवारी सकाळी मुंबई तटरक्षक दलाला MV Mangalam बोटीवरुन अधिकाऱ्याचा मदतीसाठी कॉल आला, ज्यात मंगलम बोट ही समुद्रात बुडत असल्याचं तटरक्षक दलाला […]
ADVERTISEMENT
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या MV Mangalam या बोटीतील १६ खलाशांना सुखरुप वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटीने हे रेस्क्यु ऑपरेशन पार पाडत १६ खलाशांचे प्राण वाचवले.
ADVERTISEMENT
गुरुवारी सकाळी मुंबई तटरक्षक दलाला MV Mangalam बोटीवरुन अधिकाऱ्याचा मदतीसाठी कॉल आला, ज्यात मंगलम बोट ही समुद्रात बुडत असल्याचं तटरक्षक दलाला कळलं. या बोटीवर १६ खलाशी असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मंगलम ही बोट समुद्रात अर्धवट बुडाल्यामुळे बोटीच्या कॅप्टनने सर्व खलाशांना बोट सोडून समुद्रात उडी मारण्याचे आदेश दिले.
हे वाचलं का?
रेवदंडा जेटी परिसरापासून ही बोट ३ किलोमीटर अंतरावर होती. त्यामुळे तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांनी मंगलम बोटीवर अधिकाऱ्यांना धीर देत त्यांना बोट सोडू नका असा सल्ला देत तात्काळ मदत रवाना केली. दरम्यानच्या काळात तटरक्षक दलाने समुद्रात बुडणाऱ्या बोटीला मदतीसाठी आपली एक बोट रवाना केली. दमण येथील एअर स्टेशनवरुन तटरक्षक दलाचं एक हेलिकॉप्टर रेवदंड्याच्या दिशेने रवाना झालं.
सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या दरम्यान तटरक्षक दलाची बचाव नौका या भागात पोहचली आणि त्यांनी या जवानांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन सुरु केली. पावसाची संततधार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला होता . अशा परिस्थितीत या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. यानंतर तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टरही या भागात दाखल झालं आणि त्याने सर्व खलाशांना सुखरुप बाहेर काढलं. दरम्यान सर्व खलाशांना सुखरुप वाचवल्यानंतर त्यांच्या रेवदंडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. तटरक्षक दलाने वेळेत पावलं उचलून केलेल्या कारवाईमुळे १६ खलाशांचा जीव वाचवला गेल्यामुळे त्यांचं कौतुक करण्यात येतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT