चक्रीवादळादरम्यान मुंबईच्या समुद्रात अडकले 410 जण, खोल समुद्रात नौदलाच्या जवानांनी लावली प्राणांची बाजी
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) काल (17 मे) दिवसभर मुंबईत (Mumbai) अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ज्याचा फटका संपूर्ण मुंबईसह आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. समुद्रात (Arabian sea) बऱ्याच खोलवर असलेल्या या चक्रीवादळाने मुंबईला जोरदार तडाखा दिला आहे. त्यातच आता एक अशी माहिती समोर आली आहे की, मुंबईनजीकच्या ‘बॉम्बे हाय’ येथील दोन बोटींवर तब्बल 410 जण अडकले […]
ADVERTISEMENT
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) काल (17 मे) दिवसभर मुंबईत (Mumbai) अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ज्याचा फटका संपूर्ण मुंबईसह आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. समुद्रात (Arabian sea) बऱ्याच खोलवर असलेल्या या चक्रीवादळाने मुंबईला जोरदार तडाखा दिला आहे. त्यातच आता एक अशी माहिती समोर आली आहे की, मुंबईनजीकच्या ‘बॉम्बे हाय’ येथील दोन बोटींवर तब्बल 410 जण अडकले होते. ज्यापैकी 146 जणांची सुटका करण्यात आली असून अद्यापही अनेक जण बोटींवर अडकले असल्याचं समजतं आहे. काल रात्रभर हे बचाव कार्य सुरुच होतं.
ADVERTISEMENT
मुंबईच्या समुद्रात अडकलेल्या या 410 जणांना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाने (India Navy) आपल्या तीन भल्या मोठ्या जहाजांना घटनास्थळी पाठवलं होतं. यावेळी इतरांना वाचविण्यासाठी नौदलाच्या जवानांनी अक्षरश: आपल्या प्राणांची बाजी लावली. मुंबईपासून जवळजवळ 175 किलोमीटर दूर बॉम्बे हाय फिल्ड येथील हीरा ऑईल फिल्ड्स जवळ येथील एका बोटीवर कमीत कमी 273 जण अडकल्याची माहिती सर्वात आधी नौदलाला मिळाली होती. याबाबतची माहिती नौदलाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
India Navy rescues 38 of 410 people on board two barges that went adrift off Mumbai coast as #CycloneTauktae intensified over Arabian Sea. Rescue ops for the rest underway.
(@AbhishekBhalla7)Watch #IndiaFirst LIVE now pic.twitter.com/jxgTOq0m6M
— IndiaToday (@IndiaToday) May 17, 2021
याबाबतची माहिती मिळताच भारतीय नौदलाने तात्काळ त्यांच्या सुटकेसाठी आयएनएस कोच्ची आणि आयएनएस तलवार या दोन जहाजांना बचावा कार्यासाठी (rescues operation) धाडलं. याशिवाय 137 लोकांसह अडकलेल्या जीएएल कंस्ट्रक्टरने देखील एसओएस अलर्ट पाठवला होता. जे मुंबईच्या समुद्रपासून 15 किलोमीटर दूर होते.
हे वाचलं का?
Tauktae चा फटका, ससून डॉकमधील अंदाजे ८० बोटींचं नुकसान
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच, भारतीय नौदलाने अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आयएनएस कोलकाता हे जहाज देखील घटनास्थळी रवाना केलं. नौदलातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर येणारं चक्रीवादळ लक्षात घेता इतर जहाजांना आधीपासूनच बचाव कार्यासाठी तयार ठेवण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 410 जणांपैकी 146 जणांची सुटका भारतीय नौदलाच्या जहाजांनी केली असून इतर अनेक जणांची सुटका करण्याचा प्रयत्न नौदलाकडून सातत्याने सुरु आहे. दरम्यान, हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जात आहे. तौकताई चक्रीवादळ हे आता गुजरातमध्ये धडकलेलं असलं तरीही अद्याप समुद्र खवळलेलाच आहे. त्यामुळे बचाव कार्यात काही अडचणी येत आहे.
ADVERTISEMENT
तौकताई चक्रीवादळाचं रौद्र रुप
तौकताई या चक्रीवादळाने मुंबईत ताशी 100 किमी प्रति वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे मुंबईच्या नजीक असणारा समुद्र चांगलाच खवळला होता. त्यामुळे पहिल्यांदाच समुद्राचं रौद्र रुप यावेळी पाहायला मिळत होतं. या वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची बरीच पडझड झाली. तर अनेक ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालं आहे.
Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा धडकी भरवणारा VIDEO, तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप
हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, सोमवारी मुंबईत मुसळधार पावसासह जवळजवळ ताशी 120 किमी प्रति वेगाने वारे वाहत असल्याची देखील नोंद हवामान खात्याने केली आहे. दरम्यान, मुंबईत याबाबतचा अलर्ट आधीच जारी करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT